“आजच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय इश्यू नाही”; शरद पवार यांनी भाजपच्या राजकारणावर स्पष्टच सांगितलं…

विरोधकांची मोट बांधण्याचं काम जरी सुरू असलं तरी, ते अजून चर्चात्मक पातळीवरच सुरु आहे. मात्र अजूनही त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजच्या परिस्थितीत सावरकर हा राष्ट्रीय इश्यू नाही; शरद पवार यांनी भाजपच्या राजकारणावर स्पष्टच सांगितलं...
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 6:40 PM

नागपूर : भाजपचे नेते आणि मंत्री नितिन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या भेट झाल्यानंतर शरद पवार यांची पत्रकार परिषदही झाली. शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील शेतीच्या प्रश्नांबरोबरच राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून चाललेल्या राजकारणाव महत्वपूर्ण भाष्य केले आहे. यावेळी शरद पवार यांना राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तुम्ही आणि राहुल गांधी सावरकर या विषयावर कधी काय बोलला होता का यावर बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यातील आणि देशातील अनेक महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत.

त्याविषयी आमच्यामध्ये चर्चा होते, आणि झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रश्न आहेत, मात्र सावरकर हा राष्ट्रीय इश्शू नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सुरु करण्याचे फायदे सांगताना शरद पवार यांनी सांगितले की, विदर्भातील आणि खान्देशातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. मराठवाड, विदर्भ या भागात ज्या प्रकारे सोयाबीन पिकवले जाते त्याच प्रमाणे जर ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना प्रचंड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील शेतीविषयी आगामी काळात काय प्रयोग करता येतील. आणि त्याचा फायदा या शेतकऱ्यांना कसा होणार हेही त्यांनी यावेळी सांगितले. देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी बोलताना सांगितले की, भाजपचे मिशन 400 हा प्रयोग माझ्या गावातून म्हणजे बारामतीतून चालू होत आहे.

याचा मला अभिमान आहे. त्यावर विरोधकांकडून असा काही प्रयोग चालू आहे का असा सवाल उपस्थित केला असता त्यांनी सांगितले की, प्रयोग चालू नसला तरी, त्याबाबत विचार विनिमय चालू आहे. मात्र असं भाजपसारखं आम्ही अजून काही जाहीर केलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधकांची मोट बांधण्याचं काम जरी सुरू असलं तरी, ते अजून चर्चात्मक पातळीवरच सुरु आहे. मात्र अजूनही त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर संभाजीनगरमधील राड्याविषयी बोलताना सांगितले की, अशी जर सामाजिक परिस्थिती झाली असेल तर राजकीय आणि जाणकार व्यक्तिंनी त्यावर सामंजस्याची भूमिका घेऊन अशा सामाजिक परिस्थितीची काळजी घ्यावी असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.