‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखा, सोशल मीडियावरील भावनिक बाजारापासून सावधान

नागपुरात सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात 2019 मध्ये 126 गुन्ह्यांची नोंद करण्यात आाली होती. तर 2020 मध्ये 200 च्या आसपास सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक फसवणूक, एक्सॅाटर्शन, ब्लॅकमेलिंग, सायबर बुलिंग यासारखे अनेक सायबर गुन्हे नागपुरात घडले. यातल्या काही तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचल्या. त्यामुळे सोशल मिडीया किंवा सायबर युगात वावरताना ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखा, सोशल मीडियावरील भावनिक बाजारापासून सावधान
अजित पारसे, सायबर तज्ज्ञ
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 1:26 PM

नागपूर : “अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, अनोळखी व्यक्तिला आपली व्यक्तीगत माहिती देऊ नका” बाहेरच्या जगात वावरताना कुटुंबातील मोठ्यांचा हा सल्ला आता सायबर जगात वावरतानाही, तेवढाच फायद्याचा आहे. हाच कानमंत्र आपल्या सोशल मिडीया आणि सायबर युगात सुरक्षित ठेऊ शकतो. कारण फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राफवर अनोळखी व्यक्तींसोबत मैत्री, चाटिंग आणि व्यक्तिगत माहिती शेअर करण्यात मोठा धोका आहे. सोशल माध्यमावर ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’च्या मोहात अडकून नागपुरातील अनेक नेटकऱ्यांनी आपलं नुकसान करुन घेतलं.” सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी सायबर गुन्ह्यांच्या केलेल्या विश्लेषणात ही बाब पुढे आल्याचं त्यांनी सांगितलं.

नागपुरात सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात 2019 मध्ये 126 गुन्ह्यांची नोंद करण्यात आाली होती. तर 2020 मध्ये 200 च्या आसपास सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आर्थिक फसवणूक, एक्सॅाटर्शन, ब्लॅकमेलिंग, सायबर बुलिंग यासारखे अनेक सायबर गुन्हे नागपुरात घडले. यातल्या काही तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचल्या. त्यामुळे सोशल मिडीया किंवा सायबर युगात वावरताना ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष समाजात एकटेपणा वाटणारे लोक सोशल मिडियावर डिजीटल चॅट रुम्सकडे वळतात. या चॅटरुम्समघून काही वेळा मनोरंजन किंवा मानसिक आधार मिळू शकतो. पण, देशातील सायबर गुन्हेगारीचं विश्लेषण केल्यास यातून बऱ्याचदा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे सायबर युगात वावरताना ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका ओळखणं गरजेचं आहे.

सायबर तज्ज्ञ काय म्हणतात?

“देशात 2020 या वर्षात 50 हजारच्या वर सायबर गुन्हे घडले. यापेक्षाही पोलीस स्टेशनमध्ये नोंद न झालेले सायबर गुन्हे कितीतरीपट जास्त आहे. यातील बहुतांश सायबर गुन्हे ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका न ओळखल्यामुळे घडलेय. म्हणजेच सामाजिक माध्यमात वावरताना उठ सूठ कुणाशीही फ्रेंडशिप करणे, अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणे आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्यातून घडलेय. प्रत्यक्ष समाजात एकटेपणा वाटणारे लोक ‘डिजिटल फ्रेंडशिप’चा पर्याय निवडतात. इंटरनेट, सोशल मिडीयावर असंख्य ‘चॅट रुम्स’ आहेत, यातल्या काही फ्री तर काही पेड आहेत. काही ‘चॅट रुम्स’ ओळख जाहिर करत नसल्याचा दावा करतात आणि इथेच काहींचा तोल सुटतो आणि सुरु होते लैंगिक विषयावर खुला संवाद. हा संवाद आणि नको त्या प्रदर्शनाच्या रेकॅार्डच्या आधारे युजर्सला फसवले जाते. त्यामुळे धोका ओळखून पावलं उचलावी. आभासी जगात वावरताना सावधानता बाळगावी” असं आवाहन सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी नेटकऱ्यांना केलं आहे.

नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका जेष्ठ नागरीकाची अशीच फसवणूक झाली. एकटेपणा घालवण्यासाठी ते विदेशात राहणाऱ्या तरुणीशी चॅट करत करायचे. त्यांच्यासोबतंही ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका झाला. त्यांची 75 हजारांची फसवणूक झाली. प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे. देशभरात गेल्या वर्षभरात घडलेल्या 50 हजार सायबर गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडलेय. त्यामुळे सायबर गुन्ह्यामधून आपल्या परिवाराला, समाजाला आणि देशाला सुरक्षित ठेवायचं असेल. तर सावध पावलं उचलणं हिच काळाची खरी गरज आहे.

संबंधित बातम्या :

तुमच्या क्रेडिट कार्डची काळजी घ्या, अन्यथा गुन्हेगार बँक खाते रिकामे करणार

डेटिंग अ‍ॅपवर हेरायचे सावज, भेटायला बोलावून तरुणांची लूट, सराईत टोळीतील गुंडाला अखेर अटक

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.