Nagpur : नागपूरात लग्नसमारंभातील भोंग्यांवरही येणार विघ्न, विनापरवानगी भोंगे वाजवल्यास कडक कारवाई

यापुढे नागपूरात विनापरवानगी कुठेही भोंगे वाजल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये लग्नसमारंभातील भोंगे किंवा डीजेवरती सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरती सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे.

Nagpur : नागपूरात लग्नसमारंभातील भोंग्यांवरही येणार विघ्न, विनापरवानगी भोंगे वाजवल्यास कडक कारवाई
नागपूरात लग्नसमारंभातील भोंग्यांवरही येणार विघ्नImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 8:33 AM

नागपूर – राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे पडसाद आता राज्यात उमटायला सुरूवात झाली आहे. राज ठाकरेंनी भोंगे तातडीने बंद करण्याचे सरकारला आदेश दिल्यापासून राज्यातलं वातावरण अत्यंत गरम आहे. नागपूर पोलिसांद्वारे (Nagpur Police) आता भोंग्यांबाबत नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लग्नसमारंभातील भोंग्यांवरही विघ्न येणार आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांसोबतचं लग्नसमांरभातील भोंगे आणि डिजेवरही यापुढे मर्यादा येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आखून दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या अमंलबजावणीसाठी नागपूर पोलीस सज्ज झाले आहेत. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भोंगे वाजवायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक केली आहे. विशेष म्हणजे त्याबाबत काल पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांची बैठक घेतली आहे.

विना परवानगी भोंगे वाजवल्यास कडक कारवाई

यापुढे नागपूरात विनापरवानगी कुठेही भोंगे वाजल्यास त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये लग्नसमारंभातील भोंगे किंवा डीजेवरती सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरती सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आता नागपूरात सगळ्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या अमंलबजावणीसाठी नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल नागपूर पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. विना परवानगी कुठेही भोंगे वाचवताना दिसल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल.

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातलं राजकारण तापलं

राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात भोंग्याबाबत आपली भूमिका स्षष्ट केली. तेव्हापासून महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत तापलं आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात एक जाहीर सभा घेतली. त्यावेळी सुध्दा त्यांनी आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा अल्टीमेटम दिला. पण औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत त्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना नोटिशी बजावल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.