Nagpur Booster Dose : बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 4 लाख 33 हजार 121 जणांनी घेतली लसीची तिसरी मात्रा

नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 50 लाख 95 हजार 405 आहे. यापैकी सर्व वयोगटातील 30 लाख 86 हजार 285 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र ठरले आहेत.

Nagpur Booster Dose : बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल, आतापर्यंत 4 लाख 33 हजार 121 जणांनी घेतली लसीची तिसरी मात्रा
बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये नागपूर अव्वल
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:30 PM

नागपूर : कोरोनाच्या संकटात लसीकरण हे मोठे संरक्षण ठरले. लसीकरणामुळे कोरोनाची लाट थोपवून लावता आली. मात्र पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनातर्फे बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी विशेष मोहीमसुद्धा (Special Campaign) राबविण्यात आली. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूर महापालिकेद्वारे बुस्टर डोससाठी अभियान राबविले. महाराष्ट्रात नागपूर बुस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे. शुक्रवार 19 ऑगस्टपर्यंत नागपूर शहरातील 4 लाख 33 हजार 121 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. केंद्र शासनाद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्टपर्यंत बुस्टर डोससाठी विशेष मोहीम राबविली. नागपूर महापालिकेद्वारे आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B) यांच्या नेतृत्वात या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात आली. मनपाद्वारे 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या नि:शुल्क लसीकरणामध्ये ‘हर घर दस्तक’ (Har Ghar Dastak) मोहीमसुद्धा राबविण्यात आली. पात्र सर्व व्यक्तींना घरी जाउन बुस्टर डोस देण्यात आले. याशिवाय शहरात लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली.

मुंबई दुसऱ्या, तर पालघर तिसऱ्या स्थानावर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 दिवस चाललेल्या विशेष लसीकरण मोहिमेच्या सुरूवातीच्या 15 दिवसातच नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिली. 15 दिवसांत 1 लाखावर नागपूरकरांनी बुस्टर डोस घेतला. पुढे या मोहिमेला नागरिकांनी अधिक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 50 लाख 95 हजार 405 आहे. यापैकी सर्व वयोगटातील 30 लाख 86 हजार 285 नागरिक बुस्टर डोससाठी पात्र ठरले आहेत. या पात्र व्यक्तींपैकी 19 ऑगस्टपर्यंतच्या प्राप्त आकडेवारीनुसार 4 लाख 33 हजार 121 पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. हे प्रमाण 14.3 टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे, नागपूर शहराचा विचार करता 17 लाख 72 हजार 49 पात्र व्यक्तींपैकी 3 लाख 11 हजार 689 नागरिकांनी बुस्टर डोस घेतलेला आहे. हे प्रमाण 17.58 टक्के एवढे आहे. नागपूर जिल्ह्याने बुस्टर डोसमध्ये राज्याची राजधानी मुंबईला सुद्धा मागे टाकले आहे. मुंबईचे बुस्टर डोसचे प्रमाण 13.57 टक्के एवढे आहे. तर पालघर (12.4 टक्के) तिसऱ्या स्थानी आहे.

आता कोर्बेव्हॅक्सचेसुद्धा बुस्टर डोस

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर आता कोर्बेव्हॅक्स लसीचे सुद्धा बुस्टर डोस घेता येणार आहे. विशेष म्हणजे, कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड यापैकी कुठल्या एका लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या 18 वर्षावरील नागरिकांना कोर्बेव्हॅक्सचे बुस्टर डोस घेता येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाद्वारे पत्र जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत 12 ते 15 या वयोगटातील मुलांनाच कोव्हिड प्रतिबंधात्मक लस म्हणून कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जात होते. कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणांतर्गत कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन किंवा कोर्बेव्हॅक्स या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींना बुस्टर डोस दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.