नागपूर ग्रामीणच्या पालकांमध्ये कोरोनाची धास्ती, शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न, पण सरपंच NOC देईना!

नागपूर ग्रामीणमधील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत. पण अनेक गावचे सरपंच एनओसी देण्यासाठी राजी नाहीयत. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा अद्याप सुरु झाल्याय नाहीत.

नागपूर ग्रामीणच्या पालकांमध्ये कोरोनाची धास्ती, शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न, पण सरपंच NOC देईना!
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 12:57 PM

नागपूर : शिक्षण विभागाच्या आदेशाने कोरोनामुक्त भागात 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आलेय. पण नागपूर जिल्ह्यातील पालकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे. मुलांना शाळेत पाठवायला पालक आणखीही राजी नाहीयत. शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत. पण अनेक गावचे सरपंच एनओसी देण्यासाठी राजी नाहीयत.

1250 पैकी आतापर्यंत केवळ 141 शाळा सुरु

शिक्षण विभागाच्या आदेशाने कोरोनामुक्त भागात 8 ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यात आलेय. पण नागपूरच्या ग्रामीण भागांत कोरोनाती भीती कायम आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 8 ते 12 वी च्या 1250 पैकी आतापर्यंत केवळ 141 शाळा सुरु झाल्याय.

नागपूर जिल्हा परिषदेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा अद्याप सुरु नाही

नागपूर जिल्हा परिषदेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा अद्याप सुरु झाल्याय नाहीत. नव्या नियमावलीनुसार गावातील सरपंचांनी एनओसी दिल्याशिवाय झाळा सुरु करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेच्या 1100 पेक्षा जास्त शाळा सुरु झालेल्या नाहीत.

शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची नागपूर जिल्ह्यात भयावह स्थिती होती. आता ग्रामीणमध्ये कोरोना नियंत्रणात आहेत. तरीही पालकांच्या मनातील भीती गेलेली नाही. त्यामुळेच नागपूर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अद्याप सुरु झालेल्या नाही. या शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहे.

शाळा सुरु करण्यासाठी शासनाची मार्गदर्शक तत्वं कोणती?

नियमांचं पालन करणं आवश्यक

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.

संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

(Nagpur Zilla Parishad try to start school, but Sarpanch did not give NOC!)

हे ही वाचा :

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

शाळा सुरु करा, राज्यातील बहुतांश पालकांचं मत

भारतात केवळ 22 टक्के शाळांकडेच इंटरनेट सुविधा, शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतूनच उघड

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.