नागपुरात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु, राजकीय पक्षांना बंडखोरीची चिंता

| Updated on: Sep 26, 2021 | 10:23 AM

Nagpur ZP Bypoll | ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी ही पोटनिवडणूक आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक संदर्भ आणि समीकरणे बदलल्याने कुठे बंडखोरी होणार, याकडे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते लक्ष ठेवून आहेत.

नागपुरात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु, राजकीय पक्षांना बंडखोरीची चिंता
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक
Follow us on

नागपूर: राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्यासाठी सोमवार हा शेवटचा दिवस असेल. त्यामुळे आजच्या दिवसात काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Nagpur ZP bypoll 2021)

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी ही पोटनिवडणूक आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक संदर्भ आणि समीकरणे बदलल्याने कुठे बंडखोरी होणार, याकडे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षात गुप्त बैठका आणि खलबतं सुरु आहेत. उद्यापर्यंत रिंगणात नक्की कोणते उमेदवार असतील, याचे चित्र स्पष्ट होईल.

महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.

कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोटनिवडणूक होणार?

तालुका जिल्हा परिषद सर्कल

नरखेड सावरगाव, भिष्णूर

काटोल येनवा, पारडसिंगा

सावनेर वाकोडी, केळवद

पारशिवनी करंभाड

रामटेक बोथिया

मौदा अरोली

कामठी गुमथळा, वडोदा

नागपूर गोधनी रेल्वे

हिंगणा निलडोह,

डिगडोह इसासनी

कुही राजोला

 

संबंधित बातम्या:

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करणार का? काँग्रेसच्या प्रस्तावावर फडणवीसांचं पहिल्यांदाच उत्तर

राज्यपालांवर विरोधकांची टीका, फडणवीसांनी विरोधकांची ‘मळमळ’ काढली, नेमकं काय म्हणाले?

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप बहुतांश उमेदवार बदलणार, पॅटर्नही ठरला, नगरसेवकांची धाकधूक वाढली!

(Nagpur ZP bypoll 2021)