Nagpur IIM | नागपूरच्या आयआयएमची अनेक विद्यापीठांसोबत भागिदारी; उद्या राष्ट्रपती कोविंद कॅम्पसचे उद्घाटन करणार

या संस्थेने दुरस्थ शिक्षण प्रणालीमध्ये देखील क्रांती केली आहे. व्यवसायिकांना एमबीए संदर्भातील शैक्षणिक ऑन लाईन प्रशिक्षण घेण्याचे महत्वाचे कार्य संस्थेने केले आहे. गेल्यावर्षी पुणे येथील कार्यरत असणाऱ्या व्यवसायिकांना एमबीए ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम संस्थेने केले आहे.

Nagpur IIM | नागपूरच्या आयआयएमची अनेक विद्यापीठांसोबत भागिदारी; उद्या राष्ट्रपती कोविंद कॅम्पसचे उद्घाटन करणार
नागपूरच्या आयआयएम संस्थेच्या विस्तारीत कॅम्पसचे उद्घाटन 8 मे रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 5:40 AM

नागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Indian Institute of Management) (आयआयएम) भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूरचे देशासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील महत्त्व आहे. या संस्थेमुळे नागपूरचे नाव व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील प्रगत असणाऱ्या शैक्षणिक राष्ट्रांशी जोडल्या गेले आहे. या संस्थेच्या विस्तारीत कॅम्पसचे उद्घाटन (Inauguration) 8 मे रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) करणार आहे. त्यामुळे या संस्थेची चर्चा देशभर आहे. देशाचे मध्यवर्ती शहर असणारे नागपूर या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जपान, डेनमार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन युनिर्व्हसिटी ऑफ लिले फ्रान्स, वेस्ट मिनिस्टर बिझीनेस स्कुल, युनिर्व्हसिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर इग्लंड, युनिर्व्हसिटी ऑफ मेमफीस, अमेरिका, इन्स्टिट्यूट माइन्स टेलिकॉम, फ्रान्स, कोफेनहेगन बिझनेस स्कुल, डेनमार्क, च्योव युनिर्व्हसिटी ग्रॅज्युएट स्कुल ऑफ स्टॅटेजिक मॅनेजमेंट जपान आदी विद्यापींठासोबत या संस्थेचा सामंजस्य करार झाला आहे.

एमबीएचे ऑनलाईन प्रशिक्षण

या संस्थेने दुरस्थ शिक्षण प्रणालीमध्ये देखील क्रांती केली आहे. व्यवसायिकांना एमबीए संदर्भातील शैक्षणिक ऑन लाईन प्रशिक्षण घेण्याचे महत्वाचे कार्य संस्थेने केले आहे. गेल्यावर्षी पुणे येथील कार्यरत असणाऱ्या व्यवसायिकांना एमबीए ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम संस्थेने केले आहे. व्यवसायिकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याचे कार्य नागपूरच्या या संस्थेद्वारे झाले आहे. या अभ्यासक्रमामार्फत कार्यरत असणाऱ्या व्यवसायिकांच्या कौशल्यात भर पडणार आहे.

नव्या कॅम्पसमुळे झळाळी

गेल्यावर्षीच्या कोरोना काळ बघता विद्यार्थी दाखल होण्याचे प्रमाण कमी होईल, अशी शंका होती. मात्र, संस्थेने 100 टक्के जागा भरल्या आहेत. 132 एकरांच्या या प्रकल्पामध्ये व्यवस्थापन व आस्थापनाचे महत्वाचे केंद्र उघडण्यात आले आहे. 665 विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या प्रशिक्षणाची यंत्रसामुग्रीने ह्या वर्गखोल्या सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती या संस्थेला मिळत आहे. 2015 ला सुरु झालेल्या या संस्थेला नव्या कॅम्पसमुळे झळाळी आली आहे.

हे सुद्धा वाचा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.