“प्रशांत किशोर यांनी दोनवेळा सांगितलंय, राहुल गांधींच पंतप्रधान होणार”
प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यापासून देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलंय.
अमरावती : प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यापासून देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलंय. शरद पवार पंतप्रधान होणार का? यावरही चर्चा रंगलीय. यावर अनेक राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या भेटीवर भाष्य केलंय. प्रशांत किशोर यांनी दोनवेळा सांगितलंय की राहुल गांधी हेच पंतप्रधान होतील, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. नाना पटोले यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलंय. त्यांनी अमरावतीमधील कोविड सेंटरला भेट देत रुग्णांच्या नातेवाईकांची विचारपूस करत चर्चा केली (Nana Patole comment on Prashant Kishor and Sharad Pawar UPA Future PM).
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर देशात नवीन यूपीए स्थापन होईल आणि त्याचे नेते शरद पवार असतील अशी चर्चा सुरू आहे. असं असलं तरी त्यांचं प्रमोशन करणाऱ्या लोकांनीच सांगितलं की काँग्रेस युपीएचा आत्मा आहे. त्यामुळे पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल. प्रशांत किशोर यांनीसुद्धा दोनदा सांगितला आहे की राहुल गांधीच पंतप्रधान बनतील. त्यामुळे आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात दोन वेळा देशात यशस्वीरित्या सरकार चाललं हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे कोणाच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही.
काँग्रेसच्या आघाडीत किती पक्ष उरलेयत हे आता तपासायला हवे, नवी मजबूत आघाडी उभारण्याची गरज: राऊत
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट म्हणजे राजकारणात उलथापालथ करणारी घटना: राऊत
यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंदर्भातही भाष्य केले. प्रशांत किशोर हे कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत. त्यांचे काम वेगळ्या प्रकारचे असते. त्यांना आम्ही सुद्धा अनेकदा भेटलो आहोत. उद्धव ठाकरे पण भेटले आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी आमच्यासाठी तसेच काँग्रेससाठी पण काम केले आहे. ते एक प्रोफेशनल राजकीय रणनीतीकार आहेत. जर एखाद्या पक्षाचे प्रमुख नेते त्यांना भेटून चर्चा करत असतील तर ते त्यांच्या पक्ष कार्याविषयी, विस्ताराविषयी चर्चा केली असेल. प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट ही राजकारणातील मोठी उलथापालथ करणारी घटना असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!
लोकसभेच्या 400 जागांवर भाजपला मात कशी देता येऊ शकते?; प्रशांत किशोर यांनी सांगितलं पवारांना टॉप सिक्रेट!
प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही; पण भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार: नवाब मलिक
व्हिडीओ पाहा :
Nana Patole comment on Prashant Kishor and Sharad Pawar UPA Future PM