Nana Patole : महाराष्ट्रातलं ईडी, भाजपप्रणित सरकार हे इव्हेंटबाज, नाना पटोले यांची टीका

Nana Patole : महाराष्ट्रातलं ईडी, भाजपप्रणित सरकार हे इव्हेंटबाज, नाना पटोले यांची टीका

| Updated on: Sep 01, 2022 | 8:01 PM

शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली. पण, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. अजूनही पंचनामेचं सुरू आहेत. त्यामुळं हे शेतकरीविरोधी सरकार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्रातलं ईडी, भाजप प्रणित सरकार हे इव्हेंटबाज असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. 2014 ते 2019 या काळात त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री हे गावात मुक्कामानं राहिले. त्याचा प्रचार, प्रसार झाला. ज्याच्या घरी मुख्यमंत्री होते त्यानीच आत्महत्या केली. कृषिमंत्रीपद हे शेतीतून आलेल्या माणसाला मिळावं, अशी अपेक्षा असते. कारण त्याचं दुःख त्यांना माहीत असतं. आताच्या कृषिमंत्र्यांनी हे इव्हेंट जाहीर केलं. यांचा शेतकऱ्यांशी कधी संबंध राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली. पण, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. अजूनही पंचनामेचं सुरू आहेत. त्यामुळं हे शेतकरीविरोधी सरकार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

Published on: Sep 01, 2022 08:01 PM