लखीमपूर खेरी घटनेनंतर नागपुरात काँग्रेस आक्रमक, शेतकरी आंदोलनाला चिरडण्याचा मोदी सरकारवर आरोप

देशात स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचे अनेक आंदोलने अहिंसक पद्धतीनं झाली. काधीही या आंदोलनाला गालबोट लागलं नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनात चिरडण्याचा प्रयत्न होतोय. हिंसा केली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी केलाय.

लखीमपूर खेरी घटनेनंतर नागपुरात काँग्रेस आक्रमक, शेतकरी आंदोलनाला चिरडण्याचा मोदी सरकारवर आरोप
lakhimpur kheri
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 4:02 PM

नागपूर : देशात स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचे अनेक आंदोलने अहिंसक पद्धतीनं झाली. काधीही या आंदोलनाला गालबोट लागलं नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न होतोय. हिंसा केली जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी केलाय. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातदेखील ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मोहन प्रकाश यांनी वरील वक्तव्य केलंय.

मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम करतोय 

“मंत्र्याचा मुलगा शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम करत आहे. जे नेते शेतकऱ्यांचं सांत्वन करायला जात आहेत त्यांना अडविले जात आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत हेच घडलं. ज्या ज्या वेळी प्रियांका गांधी अशा प्रकरणात भेटायला गेल्या त्या त्या वेळी त्यांना अडविलं गेलं. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन अहिंसक पद्धतीनं झाली. काधीही या आंदोलनाला गालबोट लागलं नाही. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनात चिरडण्याचा प्रयत्न होतोय, हिंसा केली जात आहे, असं मोहन प्रकाश म्हणाले.

मोहन भागवत यांच्या निर्देशानुसार भाजप सरकार काम करतंय

तसेच पुढे बोलताना यापूर्वी विरोधकांना अशा पद्धतीने अडविण्याचे प्रकार घडले नाही. आता देशात लोकशाही उरली नाही. मोहन भागवत यांच्या निर्देशानुसार भाजप सरकार हा प्रकार करत आहे, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला. तसेच पुढे बोलताना प्रियांका गांधी यांना तत्काळ सोडून त्यांना शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाऊ द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.

 मोदी सरकार देशातील लहान उद्योजकांना संपवित आहे

मोदी सरकार देशातील लहान उद्योजकांना संपवित आहे. सध्या अमेझॉनचा द ग्रेट इंडियन सेल सुरू आहे. यामुळं रोजगार गेलाय आणि छोटे उद्योजक संपणार आहेत. देशातील 41 ऑर्डिन्सन्स फॅक्टरी केंद्रानं खाजगी लोकांच्या घशात घातल्या. यामुळं लाखो कर्मचारी चिंतेत आहेत. भारतीय सेनेला शस्त्रासाठी विदेशी कंपनीवर अवलंबून राहावं लागणार आहे. तसंच या देशाची लाईफलाईन असलेल्या LIC चे खासगीकरण भाजपनं केलंय, असा आरोपदेखील मोहन प्रकाश यांनी केलाय.

प्रियंका गांधी यांना लखीपूरला जाताना अटक

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. आधी नजरकैदेत ठेवलेल्या प्रियांकांवर युपी पोलिसांनी 36 तासांनी कारवाई केली आहे. याआधी प्रियांका गांधींनी ट्विटरवर लखीमपूर हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओ शेअर करुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले. पोलिस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असा निश्चय बोलून दाखवत त्यांनी पोलिसांना आव्हान दिलं होतं.

इतर बातम्या :

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशात ‘जालियनवाला बाग’सारखी परिस्थिती, देशातील शेतकरी उत्तर देतील : शरद पवार

Pandora Papers: सचिन तेंडुलकरनंतर अनिल अंबानी, जॅकी श्रॉफ आणि नीरा राडियाही अडचणीत?

सोशल मीडिया डाऊन, मार्क झुकरबर्गचे प्रचंड आर्थिक नुकसान, श्रीमंतांच्या यादीतून घसरण

(narendra modi government trying to opposing and killing farmers criticizes congress spokesperson mohan prakash)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.