उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला, नवनीत राणांची जहरी टीका

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. (navneet rana slams cm uddhav thackeray over zp election result)

उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल आज लागला, नवनीत राणांची जहरी टीका
navneet rana
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 6:44 PM

अमरावती: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाके यांच्या बेईमानीचा निकाल लागला, अशी खोचक टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

नवनीत राणा यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. यावेळी नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात. त्यांना समजून घेतात. त्यामुळे जनतेने भाजपाला साथ दिली, असं नवनीत राणा म्हणाल्या. जनतेने शिवसेनेला नाकारले आहे. त्यामुळे जनता कोणासोबत आहे हे दिसून आलं आहे. हा तर फडणवीस यांच्या मेहनतीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा रिझल्ट आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

फडणवीस म्हणतात आमची स्पेस वाढेतय

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कोणीही प्रचाराला गेलो नाही. मी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारीह प्रचाराला गेलो नाही. तरीही आम्हालाच जनतेने निवडून दिले. 25 ट्केक जागा भाजपला मिळाल्या. 25 टक्के जागा अपक्षांना मिळाल्या आणि उरलेल्या 50 टक्के जागा आघाडीच्या तीन पक्षांना मिळाल्या आहेत. म्हणजे त्यातही आम्हीच सरस आहोत. या निकालाने भाजप नंबर 1 पक्ष तर शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सत्ता असूनही ते चौथ्या नंबरवर गेले आहेत, असं फडणवीस म्हणाले.

हा तर जनतेचा आशीर्वाद: पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचे यश हे कार्यकर्त्यांचे यश आहे, जनतेनेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरून आशीर्वाद दिला. या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी ऊर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता, त्याची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. राज्यात आणि केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात, त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

भाजपला धोबीपछाड

नागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे. तेथे भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलेला आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. नैसर्गिक संकट आलेले असताना गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले जातात, पण महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली जातात हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही, असं पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या:

नागपूरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या, फडणवीस म्हणतात, पंचायत समितीत वाढल्या, वाचा आणखी काय म्हणाले?

Nagpur ZP Winner List: नागपूरमध्ये काँग्रेसनं करुन दाखवलं, भाजपच्या गडात जोरदार मुसंडी, विजयी सदस्यांची यादी एका क्लिकवर

गड भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पण मुसंडी काँग्रेसची, नागपूर झेडपीला काँग्रेसला दणदणीत यश

(navneet rana slams cm uddhav thackeray over zp election result)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.