VIDEO: भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या, सुप्रिया सुळे का म्हणाल्या ईडीच्या कारवायांचं स्वागत?; वाचा सविस्तर

भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या धमक्यांची खिल्ली उडवली आहे. (supriya sule)

VIDEO: भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या, सुप्रिया सुळे का म्हणाल्या ईडीच्या कारवायांचं स्वागत?; वाचा सविस्तर
supriya sule
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 11:20 AM

नागपूर: भाजपकडून ईडी आणि सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या धमक्यांची खिल्ली उडवली आहे. आम्ही ईडीच्या कारवाईचं स्वागतच करतो. कारण त्याचा आम्हालाच फायदा होतो, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपला टोला लगावला आहे. (ncp leader supriya sule reaction on ed, cbi action)

राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बैठकीसाठी सुप्रिया सुळे नागपुरात आल्या होत्या. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी भाजपला टोले लगावले. भाजपकडून ईडी, सीबीआयच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीच्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करते. राष्ट्रवादीला ईडीचा नेहमीच फायदा झालाय, असा चिमटा सुप्रिया सुळेंनी काढला.

त्यात गैर काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी इतकं इम्पलसिव्हली आयुष्य जगत नाही. कोणी काही बोललं तर मी थोडासावेळ विचार करते. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. माझं आयुष्य वास्तव आहे. त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही. मात्र, ठाकरे-फडणवीस भेटीची मला माहिती नाही. सर्व पक्षाचे नेते निवडणुका सोडून आपले वैयक्तिक संबंध चांगले ठेवत असतील तर त्याचं मनापासून स्वागत करायला हवं. माझ्यावर यशवंतराव चव्हाणाचे संस्कार झाले आहेत. त्यांचे सर्वांशी वैयक्तिक संबंध चांगले होते. राजकीय मतभेद एका ठिकाणी आणि वैयक्तिक नाती एका ठिकाणी यात काही गैर नाही, असं त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडी मजबूत

ठाकरे-फडणवीस भेटीने पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर महाविकास आघाडी पाच वर्षे नाही पण 25 वर्षे या राज्याची सेव करेल, असं त्या म्हणाल्या.

आरोपात तथ्य असेल तर चौकशी करू

नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून भरती होत आहे. त्याच्या चौकशीचीही मागणी होत आहे. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. चौकशीची मागणी होत असेल आणि त्यात खरे पणा असेल तर कुणाचीही चौकशी करावी. आमचं काही दडपशाहीचं सरकार नाहीये. मागणी असेल तर माहितीचा अधिकार हा मनमोहन सरकारने दिला आहे. पारदर्शक कारभारासाठीच त्यांनी हा अधिकार दिला आहे. आताच्या केंद्र सरकारने माहितीचा अधिकारावर बऱ्याच यंत्रणा आणल्यात. आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात असताना पारदर्शकपणा काय असतो हे आम्ही दाखवून दिलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या पदभरतीची कोणी चौकशीची मागणी करत असेल तर त्याचा तो अधिकार आहे, असं त्या म्हणाल्या.

सुप्रियांचं ते विधान का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 2019मध्ये ईडीने नोटीस पाठवली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ईडीने ही नोटीस चुकून पाठवल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फायदा झाला होता. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपला चिमटे काढले आहेत. (ncp leader supriya sule reaction on ed, cbi action)

संबंधित बातम्या:

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

संजय राऊतांनी नाशिकमध्ये वात पेटवली, भाजपचा माजी उपमहापौर फोडला?

शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द; कारण गुलदस्त्यात

(ncp leader supriya sule reaction on ed, cbi action)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.