“‘मविआ’ स्थापन होण्याअगोदरपासूनच एकनाथ शिंदे ठाकरेंबरोबर नव्हते”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मुख्यमंत्र्यांच्या मनातील खदखद सांगितली
उद्धव ठाकरे यांना खाली आणण्यासाठी जे 40 आमदार गेले होते. ते उद्या पोकलेन घेऊन अख्खा महाराष्ट्र घेऊन लुटायला बाहेर पडले तरी त्यांना रोखणारा कोणीच नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेना-भाजप सरकारचा समाचार घेतला आहे.
नागपूर : सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सातत्याने ईडीकडून कारवाईटा बडगा उचलण्यात आला आहे. त्यामुळे या सरकारकडून झालेल्या ईडीच्या कारवाईत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. त्या कारवाया चालूच राहणार असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला लगावला आहे. त्यांनी ईडीच्या कारवाईवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरूनही त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावताना ते म्हणाले की, सत्ता हे सर्वस्व आहे. सत्ता मिळाली नाही तर मी माझ्या जीवाचं काही करून घेईल.
त्यामुळे सत्ता हे सर्वस्व नसतं. लोकशाहीत तुम्हाला जनतेसमोर जावं लागतं. त्यामुळे जय पराजय हा आयुष्यातील अविभाज्य घटक असल्याचे सांगत त्यांनी सत्तापरिवर्तनच्या राजकारणावर निशाणा साधला.
शिंदे यांची बंडखोरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले होते. त्यावर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मनातील त्यांनी खदखद सांगितली. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीपासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नव्हते.
मी पुरावा देणार
याबाबतीत जर कोणाला त्यांचा व्यक्तिगत पुरावा पाहिजे असेल तेव्हा मी तो पुरावा द्यायला तयार आहे. मात्र योग्य वेळ आल्यावर त्याबाबतचा मी पुरावा देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वीच मी मुख्यमंत्री झालो पाहिजे असंही एकनाथ शिंदे यांच्या मनात होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांविषयी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीचे सरकार उलथवून जे सत्तांतर झाले. ते सर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात होते. कर्नाटकमध्ये 40 टक्केवर सरकार गेले होते, मात्र 50 खोके सगळ्यांच्या मनामनात बसले होते असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
महाराष्ट्र लुटायला बाहेर पडले
या सरकारबाबत गाई-म्हशी, गाढवावर 50 खोके लिहले जाते, यावरून तुमच्याविषयी जनतेच्या मनात किती राग आहे हे लक्षात येतं ही परिस्थितीही त्यांनी यावेळी सांगितली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचे आणि त्यांच्या बेताल वक्तव्याविषयी अनेक आरोप केले गेले आहेत. मात्र गुलाबराव पाटील कसेही वागले तरी त्यांना काही होणार नाही.
उद्धव ठाकरे यांना खाली आणण्यासाठी जे 40 आमदार गेले होते. ते उद्या पोकलेन घेऊन अख्खा महाराष्ट्र घेऊन लुटायला बाहेर पडले तरी त्यांना रोखणारा कोणीच नाही अशा शब्दात त्यांनी शिवसेना-भाजप सरकारचा समाचार घेतला आहे.