अनिल देशमुखांवरील हल्ल्यानतंर काटोल पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या

अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी काटोल पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला आहे. अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

अनिल देशमुखांवरील हल्ल्यानतंर काटोल पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानतंर काटोल पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 10:56 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झालाय. नरखेड येथील शेवटची प्रचारसभा आटोपून ते काटोलच्या दिशेला जात होते. या दरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाले आहेत. अनिल देशमुख यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर अनिल देशमुख यांना उपचारासाठी नागपुरातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. तर दुसरीकडे काटोल पोलीस ठाण्याबाहेर अनिल देशमुखांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी काटोल पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला आहे. अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी या घटनेवर निषेध नोंदवला आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतरचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ट्विट करत भूमिका मांडली आहे. “प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

“निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.