कोरोना आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई, नागपुरात 1 कोटींचा दंड वसूल
कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
नागपूर : नागपुरात कोरोनाचा उद्रेक सतत सुरु आहे. नागपुरात पुन्हा एकदा कोरोनाचा (NMC In Action Mode) ब्लास्ट होऊन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच त्यांनी नागरिकांना केलं आहे. त्याशिवाय, कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत नागरिकांकडून तब्बल 1 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे (NMC In Action Mode).
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहरात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूरात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टन्सिंग, त्यासोबतच मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
1 कोटी 3 लाख 30 हजारांचा दंड वसूल
जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत 1 कोटी 3 लाख 30 हजार 174 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी ग्रामीण भागात 55 लाख 39 हजार 170 रुपये, तर नगरपरिषदांच्या क्षेत्रात 47 लाख 91 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गरज असेल तरच घराबाहेर पडा, नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नागपूरमध्ये कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून ठाकरे यांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असं आवाहनच नागरिकांना केलं आहे. तसेच अनिर्बंधपणे वागणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देतानाच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन सक्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे (NMC In Action Mode).
मंगल कार्यालयांवर कारवाई करणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील सर्व मंगल कार्यालये, रिसॉर्ट आणि लॉन्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागात कोरोनाने हातपाय पसरू नये म्हणून उद्या सोमवारपासून ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट
नागपुरात पुन्हा कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे. गेल्या 24 तासात 725 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल पाच महिन्यानंतर सर्वाधिक 9443 चाचण्या झाल्या. त्यापैकी 725 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पॉझिटीव्ह येण्याचं प्रमाण सध्या 7.67 टक्के इतक्यावर पोहोचला आहे. तर 6 जणांचा मृत्यू , तर 502 जण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात सतत होत असलेली कोरोना रुग्णांची वाढ प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनत आहे.
कोरोना लसीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह? लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळhttps://t.co/7g7m5T5SQ2#Corona #Vaccine #kaustubhDevegaonkar #IASOfficer
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
NMC In Action Mode
संबंधित बातम्या :