Nagpur Students | अर्धसैनिक दलात निवड होऊन नोकरी नाही, 65 विद्यार्थी आणि भर उन्हाळ्यात आंदोलन

देशभरातील 165 विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आमरण उपोषणामुळे यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली. आम्ही बातमी कव्हर करतानाच, एका उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला उचलून रुग्णालयात न्यावं लागलं.

Nagpur Students | अर्धसैनिक दलात निवड होऊन नोकरी नाही, 65 विद्यार्थी आणि भर उन्हाळ्यात आंदोलन
नागपुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:15 AM

नागपूर : नागपुरात विद्यार्थ्यांचे कडाक्याच्या उन्हात आंदोलन (Andolan) सुरू आहे. आंदोलनादरम्यान 70 मुलांचं उपोषण सुरू आहे. यात देशभरातील मुला-मुलीचा समावेश आहे. नागपूर मनपाकडून ना पाण्याची सोय, ना स्वच्छतागृहाची सोय करून देण्यात आली. रोज सकाळी मुलींना स्वच्छतागृहांचा शोध घ्यावा लागतो. ही व्यथा आहे नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करणाऱ्या देशभरातील 165 विद्यार्थ्यांची. देशाच्या अर्धसैनिक दलात (paramilitary party ) त्यांची निवड झाली. पण कोरोनामुळे प्रक्रिया लांबली. आता या विद्यार्थ्यांना नोकरीत घेतलं जात नाही. नागपुरातील संविधान चौकात (Sanvidhan Chowk) देशभरातील 165 विद्यार्थी गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आमरण उपोषणामुळे यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली. आम्ही बातमी कव्हर करतानाच, एका उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला उचलून रुग्णालयात न्यावं लागलं.

दीड महिन्यांपासून दखल नाही

विदर्भात 40 पेक्षा जास्त तापमान, त्यात ही तरुण मुलं- मुली आंदोलन करतात. रात्र झाली की रोडवर झोपायचं. सकाळ झाली की परिसरातील टॅायलेटचा शोध घ्यायचा. काहींचं उपोषण काहींचं मिळेल ते खायचं. आपल्या हक्कासाठी लढा द्यायचा. दीड महिन्यात केंद्र सरकारने या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. ज्या नागपूर शहरात तरुण मुली रस्त्यावर आंदोलन करत आहेत, त्यांच्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं साधं पाणी आणि फिरत्या स्वच्छतागृहाची सोयंही केली नाही. ही व्यथा आहे या आंदोलनाची.

आंदोलकांची गैरसोय

नोकरीसाठी पात्रता परीक्षा झाली. आता निवड होणार. आपण पोस्टिंगवर जाणार, अशी स्वप्न ही मुलं पाहत आहेत. पण, सुरुवातीला कोरोनामुळं निवड झाली नाही. असं त्यांना सांगण्यात आलं. आता केंद्र सरकारनं त्यांच्या या आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. हे विद्यार्थी देशाचं भवितव्य आहेत. पण, ते आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची दखल मनपानं घेतली नाही. त्यामुळं आंदोलकांची चांगलीच गैरसोय होते.

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Mahatma Phule | तृतीय रत्न नाटक 10 एप्रिलपासून महाराष्ट्रात, चंद्रपुरातील लोकजागृती संस्था सादर करणार प्रयोग

Video Buldana Fire | बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.