नागपुरात लसवंत नसणाऱ्यांचे रोखले पगार, लस नाही-पगार नाही, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस घ्या, असं वारंवार सांगूनही काही कर्मचारी काही ऐकेनात. शेवटी लस न घेणाऱ्या 11 जणांचे पगार रोखण्यात आले. त्यामुळं आता लस घेण्याची हमी त्यांनी दिली. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात 304 कर्मचारी आहेत. यातील 11 जणांनी एकही लस घेतली नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. वारंवार सांगूनही काही कर्मचारी लस घेत नव्हते. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी […]

नागपुरात लसवंत नसणाऱ्यांचे रोखले पगार, लस नाही-पगार नाही, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार
collector office
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 11:38 AM

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लस घ्या, असं वारंवार सांगूनही काही कर्मचारी काही ऐकेनात. शेवटी लस न घेणाऱ्या 11 जणांचे पगार रोखण्यात आले. त्यामुळं आता लस घेण्याची हमी त्यांनी दिली.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात 304 कर्मचारी आहेत. यातील 11 जणांनी एकही लस घेतली नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. वारंवार सांगूनही काही कर्मचारी लस घेत नव्हते. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी लस न घेणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांचे पगार रोखले. त्यानंतर कुठे या कर्मचाऱ्यांना जाग आली. आपल्याला वेगवेगळे आजार असल्यानं लस घेतली नाही, असं स्पष्टीकरण सात कर्मचाऱ्यांनी दिलेत. त्यांना वैद्यकीय कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आलंय. तर चार कर्मचाऱ्यांनी पगार रोखल्यानंतर लस घेण्याची हमी दिली. तेव्हा कुठे आता त्यांचे पगार होण्याची शक्यता आहे.

नव्या व्हेरिएंटची धास्ती

कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंटचा प्रकार समोर आला आहे. याची धास्ती साऱ्यांनीच घेतली. शासन-प्रशासनाने कामाला लागले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत आहेत. संजय गांधी निराधार योजनेतही काही कामचोर कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. योग्य माहितीच त्यांनी पुरविली नाही. त्यामुळं त्यांचे पगारही रोखण्यात आल्याचं कळते. शेवटी कारवाईचा बडगा उभारताच कर्मचारी कामाला लागले.

चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या १५ दिवसांत कुठे प्रवास केला, याची माहिती द्यावी लागणार आहे. चुकीची माहिती दिल्यास डिझॉस्टर अॅक्ट 2005 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर सुचीतील देशांमधून येणाऱ्यांना सात दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येईल. आरटीपीसीआर टेस्टनंतर निगेटिव्ह आल्यास गृहविलगीकरणात राहावे लागणार आरे. पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. राज्यात प्रवास करणाऱ्यांना दोन लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. तसेच 48 तासांच्या आतील आरटीपीसीआर टेस्ट सादर करावा लागेल. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांनाही 48 तासांतपूर्वी केलेला आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करावा लागेल.

धोकादायक! जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र तलावात, तर तलावाचे दूषित पाणी नागरिकांच्या घरात, न्यायालयात घेतली धाव

Nagpur पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.