Nagpur | आता महिला उद्योजकांसाठी स्टार्ट अप, आर्थिक सक्षमीकरणाचा उपक्रम काय आहे, जाणून घ्या
महाराष्ट्र आर्थिक सक्षमीकरणांतर्गत राज्यातील छत्तीस जिल्ह्यात उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत महिलांच्या उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यांना कठीण आणि सोपे उद्योजक नेटवर्क तयार करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातोय.
नागपूर : महिला उद्योजकांना (Women Entrepreneurs) त्यांच्या स्टार्टअपचे शाश्वत व्यवसाय उपक्रमांमध्ये रुपांतरित करण्यासाठी समर्थन देण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास (District Development Skills), रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वुमन एंटरप्रेन्युअरशिप सेलने हा उपक्रम हाती घेतला. यूएस कॉन्सुलेट जनरल मुंबई, स्टार्टअप नेक्सन आणि अलायन्स फॉर कमर्शियलायझेशन अँड इनोव्हेशन रिसर्चद्वारे या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येतोय. महिला उद्योजकांच्या (Women Empowerment) सक्षमीकरणासाठी हा उपक्रम फार लाभकारी ठरणार आहे.
काय आहेत पात्रता व निकष
महिला उद्योजक अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार हे नावीण्यपूर्ण उपक्रम, स्टार्टअपचे संस्थापक किंवा सह-संस्थापक असावेत. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. सर्व वर्ग इंग्रजीमध्ये असल्याने सहभागींना इंग्रजीचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे भारतीय राष्ट्रीयत्व असणे आवश्यक आहे. ते महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजेत. महाराष्ट्र आर्थिक सक्षमीकरणांतर्गत राज्यातील छत्तीस जिल्ह्यात उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत महिलांच्या उद्योजकीय आणि व्यवस्थापकीय कौशल्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यांना कठीण आणि सोपे उद्योजक नेटवर्क तयार करण्यासाठी हा उपक्रम राबविला जातोय.
उपक्रमाचे महिला उद्योजकांना लाभ
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीद्वारे पूर्णपणे प्रायोजित आहे. अग्रगण्य नेक्सस इनक्युबेशन प्रोग्राममध्ये 6 अंतिम स्पर्धक, मजबूत स्थानिक नेटवर्क तयार होणास मदत होईल. महिला उद्योजकांद्वारे मार्गदर्शन सत्र. सहकार्य आणि पीअर-टू- पीअर शिक्षण वाढविणे. जास्तीत जास्तीत सहभागासाठी नेटवर्कमधील नावीण्यपूर्ण महिला उद्योजकांमध्ये कार्यक्रमाचे तपशिल प्रसारीत करणार. महिला उद्योजकांनी http://www.mahawe.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी रुची सिंघानिया 7208257689 व अमित कोठावडे 9420608942 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.