तरीही काही लोक आमच्यात अतिक्रमण करतायत: विजय वडेट्टीवार

ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांची राहिलेली शिष्यवृत्ती लवकरच मिळेल. | vijay wadettiwar

तरीही काही लोक आमच्यात अतिक्रमण करतायत: विजय वडेट्टीवार
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 3:22 PM

नागपूर: ओबीसी (OBC) समाजातील भटक्या आणि पालामध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. तरीही काही लोक आमच्यामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वक्तव्य राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. (some peoples wants share in our reservation says vijay wadettiwar)

ते गुरुवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांची राहिलेली शिष्यवृत्ती लवकरच मिळणार असल्याचे सांगितले. सारथी आणि महाज्योती दोन्ही संस्थांना समान निधी मिळतोय. भविष्यात आणखी निधी मिळेल. कर्मशियल पायलटसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढू; वडेट्टीवारांचा इशारा

यापूर्वी विजय वडेट्टीवारांनी ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढण्याचा इशारा दिला होता. सर्व जण शक्ती दाखवत आहेत, वेळ पडल्यास ओबीसींचीही शक्ती दाखवू. ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला होता. ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे. ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगाभरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते.

OBC महामेळाव्याचं आयोजन, 1 लाख लोक येणार

राज्यातील ओबीसी समाजात असंतोष आहे. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मेळावे घेणार आहे. नागपुरातही ओबीसींचा महामेळावा होईल. या मेळाव्यात राज्यभरातून तब्बल 1 लाख लोक येतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

‘संभाजी महाराजांचं नाव मोठं, आमचा त्यांच्या नावाला विरोध नाही’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याविषयी विजय वडेट्टीवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा वडेट्टीवार यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्र्यांनीही तसाच उल्लेख केला होता. कोण काय करतंय हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. पण यामुळे समाजात मतभेद वाढता कामा नये. पुढील निर्णय सामंजस्याने घेतले पाहिजेत. संभाजी महाराज हे मोठी व्यक्ती आहेत. त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मेगाभरती करा, नाहीतर मेगा आंदोलन करू; ओबीसी नेत्यांचा ठाकरे सरकारला इशारा

निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? : विजय वडेट्टीवार

मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल : छगन भुजबळ

(some peoples wants share in our reservation says vijay wadettiwar)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.