Nagpur Medical | मेडिकलमध्ये ऑक्सिजनला लागली होती गळती; मोठी दुर्घटना कशी टळली?

नागपुरातील मेडिकलमध्ये ऑक्सिजनला गळती लागली. रुग्ण हलविण्यात आले. गळती थांबविण्यात आली. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. यामुळं मेडिकलमध्ये खळबळ माजली.

Nagpur Medical | मेडिकलमध्ये ऑक्सिजनला लागली होती गळती; मोठी दुर्घटना कशी टळली?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 9:41 AM

नागपूर : मेडिकलमधील (Medical) वॉर्ड क्रमांक एकमध्ये असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen) पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती लागली. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं काही रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. असं का होत आहे, याची चौकशी झाली. त्यानंतर ऑक्सिजन पाईपला गळती लागल्याची बाब समोर आली. वॉर्डातील काही रुग्णांना तात्काळ हलविण्यात आले. त्यामुळं मोठी दुर्घटना होण्यापासून टळले. ऑक्सिजन प्लांटमध्ये लीकेज झाल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी मान्य केलं. पण, तातडीने काम केल्यानं ही दुर्घटना टळली. रुग्णांवर कोणताही परिणाम झाला नाही, असंही डॉ. राजकोंडावार यांनी सांगितलं.

अर्धा तास शटडाऊन

मेडिकलमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारे तीन प्लांट लावण्यात आले आहेत. या प्लांटची देखभाल दुरुस्ती करावी लागते. यात काही त्रृटी आढळल्यास पाईपलाईन लिकेज होण्याचा धोका असतो. मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळं ऑक्सिजन पुरवठा करणारी लाईल सलग लावण्यात आली आहे. पाईल लिकेज झाल्यास ऑक्सिजन यंत्रणा कोलमडते. त्यासाठी मध्यंतरी व्हॉल्व्ह लावायला हवे होते, असं काही तज्ज्ञांचं म्हणण आहे. अर्धा तास शटडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू झाला.

वॉर्ड क्रमांक एकमध्ये पुरवठा होणाऱ्या प्लांटला गळती

मेडिकलमध्ये ऑक्सिजनचे तीन प्लांट आहेत. यात मेडिकलच्या कोविड रुग्णालय परिसरात तीन हजार दोनशे एलपीएम, शासकीय दंत रुग्णालय परिसरात जाणाऱ्या मार्गावर तीन हजार दोनशे एलपीएम आणि दोन हजार एलपीएमचा एक असे तीन ऑक्सिजन प्लांट आहेत. तसेच वॉर्ड क्रमांक चोवीसच्या मागच्या भागातही एक प्लांट आहे. या प्लांटमधून पाईपलाईन वॉर्ड क्रमांक एकमध्ये ऑक्सिजन पुरवठा होतो. याच पाईपलाईनला गळती लागल्यानं धोका निर्माण झाला होता.

SPPU Exam | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच, तारीखही ठरली

America Texas Hostage : अमेरिकेत धार्मिक कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह, बंदूकधाऱ्याचा प्रवेश 4 जण ओलीस,नेमकं काय घडलं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.