कुरिअर उघडताच सावधान! नागपुरात चक्क कुरिअरमधून विषारी कोब्य्राचं पार्सल, कुणाला संपवण्याचा घाट?
बेंगळुरुत असलेल्या भाड्याच्या खोलीतील वस्तू युवतीनं कुरियरनं मैत्रिणींकडून मागविल्या. ट्रान्सपोर्टमधून नागपुरात 8 बॉक्स आलेत. सोमवारी संध्याकाळी एका बॉक्समधून चक्क कोब्रा साप निघाला. भीतीपोटी बॉक्स अंगणात ठेवल्यानंतर कोब्रा बाजूच्या गडरलाईनमध्ये शिरला. सर्पमित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही दिसलाच नाही.
नागपूर : साप म्हटलं की बऱ्याच जणांची घाबरगुंडी उडते. त्यात तो विषारी असला, तर मग भीती अधिकच वाढते. अशीच घटना नागपुरातील ज्ञानेश्वरनगरात घडली. युवतीने बेंगळुरुवरून कुरियरने काही वस्तू मागविल्या. कुरियरनं आलेल्या वस्तूंमध्ये पाहते तर काय एक साप निघाला. तोही विषारी कोब्रा.
सेवानिवृत्त शिक्षक सुनील लखेटे यांची मुलगी बेंगळुरुला नोकरीला आहे. मात्र, कोरोनामुळं ती वर्क फ्राम होम करत आहे. बेंगळुरुत असलेल्या भाड्याच्या खोलीतील वस्तू युवतीनं कुरियरनं मैत्रिणींकडून मागविल्या. ट्रान्सपोर्टमधून नागपुरात 8 बॉक्स आलेत. सोमवारी संध्याकाळी एका बॉक्समधून चक्क कोब्रा साप निघाला. भीतीपोटी बॉक्स अंगणात ठेवल्यानंतर कोब्रा बाजूच्या गडरलाईनमध्ये शिरला. सर्पमित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही दिसलाच नाही.
चौथ्या बॉक्समध्ये सापाची फुत्कारी
नागपुरात वडधामना येथील कुरियर कंपनीच्या गोदामात युवतीनं मागितलेले आठही बॉक्स आलेत.सुनील लखेटे यांनी एक-एक करत तीन बॉक्स उघडले. त्यातील साहित्य घरात ठेवले. चौथा बॉक्स उघडताच त्याच्यामध्ये सापाची फुत्कारी ऐकू आली. त्यामुळे लखेटे यांनी सावध होऊन पाहिले. त्यामध्ये कोब्रा साप गुंडाळी मांडून बसलेला दिसला. त्यानंतर पळापळ सुरू झाली. हिमतीने लखेटे कुटुंबीयांनी तोच बॉक्स लाकडाच्या साह्यानं ओढत अंगणात नेला. तिथे तो उलटवताच साप त्याच्यातून निघून जवळच्या गटरलाईनमध्ये शिरला. तो साप सुमारे पाच फुटांचा असल्याची माहिती लखेटे यांनी दिली.
बॉक्सला होते छोटेसे छिद्र
विशेष म्हणजे खरड्याच्या ज्या बॉक्समधून साप निघाला त्या बॉक्सच्या खाली छिद्र होते. त्याच्यातूनच सापाने बॉक्समध्ये प्रवेश केला असावा असा अंदाज आहे. मात्र साप थेट बेंगळुरुमधून नागपुरात आला की कुरिअर कंपनीच्या नागपुरातील गोदामातून बॉक्समध्ये बसला हे स्पष्ट झालेलं नाही. सापाने कुणाचाही चावा घेतला नाही. तो तिथून निघून गेला. सर्पमित्रांनी कोब्राला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, तो काही दिसला नाही. या घटनेमुळं लखेटे कुटुंबीय हादरले आहेत. त्यामुळं कुरियरनं आलेलं सामान पाहताना जरा सांभाळून असच म्हणावं लागेल.
नंदनवनमध्ये दारुच्या वादातून मित्राची हत्या, आरोपीने गुन्ह्याची दिली कबुली
गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती, 47 व्या वर्षी दिला बाळाला जन्म