उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोठी अंडरस्टँडिंग; प्रकाश आंबेडकर यांचा हादरा देणारा गौप्यस्फोट काय?

वंचित बहुजन आघाडीचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही काल एका सभेत स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. कुणाचंच काही ठरत नसेल तर आम्ही स्वबळावर लढू शकतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. कालचं त्यांचं हे विधान ताजं असतानाच आंबेडकर यांनी आज नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोठी अंडरस्टँडिंग; प्रकाश आंबेडकर यांचा हादरा देणारा गौप्यस्फोट काय?
prakash ambedkar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 4:27 PM

नागपूर | 25 डिसेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या 48 जागा मोठ्या ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी कालच सांगितलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय अंडरस्टँडिंग झाली होती, याचा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर आज नागपुरात आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेलं सिक्रेटही सांगितलं. उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे. म्हणजे लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा आम्ही लढणार असं मोघम ठरलं होतं. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तर फॉर्म्युला वेगळा होईल

महाविकास आघाडीचं काहीच झालं नाही तर मग आम्ही फिफ्टी-फिफ्टी लढू. त्यांचं जागा वाटप ठरलं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो. काहीच झालं नाही आणि सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागले. आम्हीही 48 जागा लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

सभेवेळी दुर्घटना

दरम्यान, नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची आज ‘स्त्री मुक्तीदिन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सुरू होण्यापूर्वीच सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळला. त्यामुळे मंचावरील मागच्या बाजूला असलेले बॅनर खाली पडले आहेत. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी नाही.

रेडकार्पेट टाकून स्वागत करू

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडीवर भाष्य केलं आहे. युती झाल्याचं भासवून फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा परिणाम थेट ठाकरे गटाला दिसेल. प्रकाश आंबेडकर यांना झुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आंबेडकर महाविकास आघाडीला जागा दाखवतील. आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू, असं संजय शिरसाट म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.