नागपूर जिल्हा परिषदेत ‘ॲापरेशन कमळ’ची तयारी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजप सुरुंग लावणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडलेत. लवकरच नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट होईल, असा दावा खुद्द भाजपचे विरोधीपक्ष नेते आतिश उमरे यांनी केलाय.

नागपूर जिल्हा परिषदेत ‘ॲापरेशन कमळ’ची तयारी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला भाजप सुरुंग लावणार?
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 3:52 PM

नागपूर : महाविकास आघाडीची सत्तापालट करण्यासाठी महाराष्ट्रात ‘ॲापरेशन लोटस’ राबवण्यात आलं. “काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेतही ‘ॲापरेशन लोटस’ राबवलं जाणार आहे. खुद्द नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपचे विरोधीपक्ष नेते सतीश उमरे यांनी हा दावा केलाय. जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नाराज सदस्यांचा गट भाजपच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडलेत. लवकरच नागपूर जिल्हा परिषदेत सत्तापालट होईल, असा दावा खुद्द भाजपचे विरोधीपक्ष नेते आतिश उमरे यांनी केलाय.

काँग्रेसमधील काही पदाधिकारी नाराज

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांचं वर्चस्व आहे. त्यांचाच गट सध्या सत्तेत आहे. पण त्यांच्या गटातंही पदाधिकाऱ्यांवरील नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्येही भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जातेय.

झेडपीमध्ये होणार ऑपरेशन लोटस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यातील, जिल्हा परिषदेत काँग्रेस ‘ॲापरेशन लोटस’ यशस्वी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

भाजपला १५ सदस्यांची गरज

नागपूर जिल्हा परिषदेतील एकूण ५८ सदस्यांपैकी काँग्रेसचे ३२, तर १४ भाजपचे, राष्ट्रवादीचे ८ सदस्य आहेत. शिवसेना (शिंदे गट), शेकाप, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष असे चार सदस्य आहेत. भाजपला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी १५ सदस्य आवश्यकता आहे. त्यासाठी ‘ॲापरेशन लोटस’ची तयारी सुरु झालीय.

सुनील केदार यांनी संघटन मजबूत करून जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आणली. नागपूर जिल्ह्यात भाजपचे दिग्गज आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तरीही जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. यामुळे भाजप ऑपरेशन लोटस करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.