Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

नागपूर जिल्हा परिषद शिक्षकांची गुणवत्ता चाचणी घेणार आहे. त्यामुळं ते या गुणवत्ता चाचणीला कसे सामोरे जाणार हे पाहावे लागले.

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?
नागपूर जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 5:00 AM

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांचा (Zilla Parishad schools) दर्जा घसरत चालला. आता कोरोनामुळं विद्यार्थी आणखी दोन वर्षे मागे गेलेत. सरकार जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पटसंख्या वाढीसाठी मोफत गणवेश (Free uniforms) देते. पाठ्यपुस्तकं तसेच मध्यान्ह भोजन पुरविते. याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देते. तरीही जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी खासगी शाळांच्या तुलनेत मागे का राहतो. यावर विचार करण्यात आला. त्यानंतर शिक्षकांनी चांगले पगार असतात. ते तज्ज्ञही आहेत. त्यांची मुलं खासगी शाळेत शिकत असतील, तर हा भाग वेगळा. या सर्व बाबींचा विचार करता शिक्षकांची चाचणी (Teacher testing) घेण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले.

शिक्षण सभापतींच्या दौऱ्यात अनेक बाबी उघड

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बर्वे म्हणाल्या, कोरोनानंतर आता प्रत्यक्षात ग्रामीण भागातील सर्वच शाळांचे वर्ग सुरू झालेत. शिक्षण सभापती भारती पाटील यांनीही शाळांचे दौरे केले. या दौर्‍यांमध्ये त्यांना शाळांमध्ये शिक्षक् वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आले. काही शिक्षक प्रार्थना झाल्यानंतर शाळेमध्ये येतात. काही शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ताही घटत आहे. जि. प. शाळेत चांगले शिक्षण मिळत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची गुणवत्ता चाचणी होणे गरजेचे आहे, असे भारती पाटील यांना वाटले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रशासनाला या सूचना करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषद शिक्षकांची गुणवत्ता चाचणी घेणार आहे. त्यामुळं ते या गुणवत्ता चाचणीला कसे सामोरे जाणार हे पाहावे लागले.

जिल्हात साडेचार हजार शिक्षक

नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार पाचशेवर शाळा आहेत. सोळा पेक्षा जास्त माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये साडेचार हजार शिक्षक कार्यरत आहेत. एवढा मोठा फौजफाटा असून विद्यार्थी संख्या का रोडावते. खासगी शाळांमध्ये विद्यार्थी पैसे देऊन का शिकतात, ही आत्मचिंतन करणारी बाब आहे. त्यामुळं जिल्हा स्तरावर शिक्षकांसाठी प्रशिक्षण राबविणे गरजेचे झाले आहे. शिक्षक प्रशिक्षित झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.