राहुल गांधी यांचं आतापर्यंतचं सर्वात धडाकेबाज भाषण, भाजपमध्ये गुलामगिरीचा दावा ते काँग्रेसने देशाला काय-काय दिलं? सविस्तर सांगितलं

"आमचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांबद्दल एक प्रश्न विचारला होता, जीएसटी तुम्ही जो लावला त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय वाटा असेल? मोदीजींना प्रश्न आवडला नाही. पटोले आऊट झाले", असं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.

राहुल गांधी यांचं आतापर्यंतचं सर्वात धडाकेबाज भाषण, भाजपमध्ये गुलामगिरीचा दावा ते काँग्रेसने देशाला काय-काय दिलं? सविस्तर सांगितलं
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 5:41 PM

नागपूर | 28 डिसेंबर 2023 : काँग्रेसचा आज 139 वा वर्धापन दिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी धडाकेबाज भाषण केलं. “देशात सध्या विचारधारेची लढाई सुरु आहे. लोकांना वाटतंय की राजकीय लढाई आहे, सत्तेची लढाई आहे, ती आहेच, पण या लढाईचे मुळ हे विचारधारेचे आहेत. दोन विचारधारेची लढाई आहे. अनेक पक्ष आहेत. कुणी एनडीएत आहेत, तर कुणी इंडिया आघाडीत आहे. पण लढाई दोन विचारधारेत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

“काही दिवसांपूर्वी भाजपचा एका खासदार मला लोकसभेत भेटला, अनेक भाजप खासदार आधी काँग्रेस पक्षात होते तसा हा देखील काँग्रेस पक्षात होता. मला चोरुन भेटला. मला लांबून पाहिलं, लपून, भीतीने म्हणतो, राहुलजी आपल्यासोबत बातचित करायची आहे. मी म्हटलं, काय बोलायचं आहे, तुम्ही तर भाजपात आहात? त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. मी विचारलं, सर्व ठीक आहे ना? तर म्हणाला, नाही. काय झालं? तर तो म्हणाला, राहुलजी भाजपमध्ये राहून सहन होत नाही. मी भाजपात आहे, पण माझं मन काँग्रेसमध्ये आहे. मी म्हटलं की, तुझं मन काँग्रेसमध्ये आणि शरीर भाजपात आहे. याचा अर्थ मन शरीराला काँग्रेसमध्ये आणण्यासाठी घाबरत आहे”, असं राहुल गांधी भाषणात म्हणाले.

“मी म्हटलं, मन का नाही मानत आहे? तुम्ही खासदार आहात. तुम्ही मला हिंट देत आहात. मग मन का नाही मानत आहे? म्हणतो, राहुलजी भाजपात गुलामी चालते, जे वरिष्ठांकडून सांगितलं जातं ते न विचार करता करावं लागतं. आमचं कुणी ऐकत नाही. वरुन ऑर्डर येते, जसं आधी राजा आदेश द्यायचे, तसं वरिष्ठांकडून आदेश येतात आणि त्याचं पालन करावं लागतं. आपल्याला त्याचं पालन केल्याशिवाय पर्याय नसतो”, असं राहुल गांधींनी सांगितलं.

‘मोदीजींना प्रश्न आवडला नाही, पटोले आऊट झाले’

“आमचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांबद्दल एक प्रश्न विचारला होता, जीएसटी तुम्ही जो लावला त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय वाटा असेल? मोदीजींना प्रश्न आवडला नाही, पटोले आऊट झाले. त्यांची विचारधारा राजेशाहीची विचारधारा आहे. कुणाचं ऐकायचं नाही. आदेश वरिष्ठांकडून येणार आणि आपल्याला त्याचं पालन करावं लागेल”, असा दावा राहुल गांधींनी केला.

‘काँग्रेस पक्षाचा आवाज ग्राऊंड पातळीतून’

“काँग्रेस पक्षात आवाज खालून येतो, ग्राऊंड पातळीतून, आमचा लहानातील लहान कार्यकर्ता आमच्या कोणत्याही नेत्याला टोकू शकतो. आमचा कार्यकर्ता माझ्या समोर येतात आणि मला म्हणतात राहुलजी, हे तुम्ही जे केलं ते चांगलं नाही केलं. तेव्ही मी त्यांना सांगतो की, मी यासाठी हे केलं. मी त्यांचं ऐकतो. त्यांच्या आवाजाचा आदर करतो. मी हेही सांगतो की, मी तुमच्या मताशी सहमत नाही. पण त्याचा आवाज ऐकतो”, असं राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस पार्टीने देशाला काय दिलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं

“लोक म्हणतात, काँग्रेस पार्टीने काय केलं? स्वातंत्र्याआधी तुम्ही या देशात आले असते तर, पाच-सहाशे राजा होते, इंग्रज होते, राजांसाठी तोफांची सलामी असायची. पण हिंदुस्तानच्या जनतेला या देशात काहीच अधिकार नव्हते. गरीब व्यक्तीची जमीन राजाला चांगली वाटली तर राजा ती जमीन घेऊन जात होता. या सर्व अधिकारांचं संरक्षण बाबासाहेबांचं संविधान करतं. जे नेहरुजी, गांधीजी यांनी रक्त आटून तयार केलं आहे. आरएसएस आणि भाजपचे लोक याविरोधात होते. आज ते झेंडासमोर सलाम करतात. पण ते अनेक वर्ष तिरंगेसमोर सलाम करत नव्हते”, असं राहुल गांधी म्हणाले.

“सर्व अधिकार संविधानाकडून मिळतात. राजा जे हवं ते करत होता. त्याच्यासाठी कोणताच कायदा नव्हता. हे काम काँग्रेस पक्षाने केला. हे हिंदुस्तानच्या हजारो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केलं गेलं. पहिल्यांदा एका हिंदुस्तानीला एक मत दिलं गेलं. मग तो दलित, आदिवासी, महिला असो, कोणत्या जातीचा असो, कुठल्याही भागातला असो, प्रत्येक नागरिकाला संविधान एक मत देतं. हे काँग्रेसने केलं”, असं राहुल गांधी ठणकावून म्हणाले.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष संघर्ष केला’

“गांधीजी जेल गेले, नेहरुजी जेल गेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष संघर्ष केला. हे काँग्रेस पार्टीच्या सर्व दिग्गजांनी मिळून दिलंय. आमची विचारधारा सांगते की, देशाची लगाम जनतेच्या हातात पाहिजे. देशाला आधी जसं राजा चालवायचे, तसं चालवू जावू नये. आम्ही जनशक्ती, लोकशक्तीची गोष्ट करतो. तुम्ही आमचे सर्व कायदे बघा. स्वातंत्र्याची लढाई देशाच्या जनतेने लढली होती. राजा-महाराजांनी लढली नव्हती. त्यांची इंग्रजांसोबत पार्टनर्शिप होती. लोक विचार करतात की, स्वातंत्र्याची लढाई फक्त इंग्रजांविरोधात होती. पण तसं नाही. राजा-महाराजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती. त्याविरोधात काँग्रेस गरीब जनेतासाठी लढली होती”, असं ते म्हणाले.

‘भारताच्या जनतेला काहीच अधिकार नव्हते’

“तुम्ही इथे स्वातंत्र्यपूर्व काळात आला असता तर भारताच्या जनतेला काहीच अधिकार नव्हते. दलितांना स्पर्शही केला जात नव्हता. ही आरएसएसची विचारधारा आहे. आता पुन्हा ते तिथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे ते देशाला परत पाठवत आहे. संविधान, मतापासून वेगवेगळ्या संस्था बनतात. या संस्था आपल्या आहेत. निवडूणक आयोग, सुप्रीम कोर्ट ही संस्था तुमच्या आहेत. सर्व संस्थांवर हे कब्जा करत आहे. सर्व व्हाईस चान्सलर एकाच संघटनेचे आहेत. त्यांना काही येत तर नाही. भारचाचे व्हाईट चान्सलर आज मेरीटवर नसतात. सर्व संस्था जिथून तुमच्या आवाजाचं संरक्षण होतं, जिथून देश चालवला जातो त्यावर ते कब्जा करत आहेत”, असा दावा राहुल गांधींनी केला.

“मीडियाकडे बघा. माध्यम लोकशाहीचं संरक्षण करत असल्याचं बोललं जायचं. पण तसं होतंय? तुम्ही त्यांना विचारा, पण ते बोलतील. आमच्या मनात जे आहे ते आम्ही बोलू शकत नाही. कारण त्यांच्या मनात भारतीयांचं म्हणणं आहे. सीबीआय, ईडीचा दबाव आहे. लढाई या गोष्टीची आहे. आम्ही देशाच्या जनतेला, देशाची शक्ती देऊ इच्छित आहोत”, असं मत त्यांनी मांडलं.

‘सफेद क्रांती देशाच्या महिलांनी, हरीत क्रांती शेतकऱ्यांनी केली, काँग्रेसने फक्त मदत केली’

“लोक म्हणतात की, काँग्रेस पक्षाने सफेद क्रांती केली. आम्ही सफेद क्रांतीत मदत केली. पण सफेद क्रांतीला आनंदच्या महिलांनी सुरुवात केली. सफेद क्रांती हिंदुस्थानच्या नारीशक्तीने केली. हरीतक्रांती देशाच्या शेतकऱ्यांनी केली. आयटी क्रांती देशाच्या युवकांनी केली. काँग्रेस पक्षाने मदत केली. आता मी तुम्हाला विचारु इच्छितो, गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशातील कोट्यवधी युवकांची शक्ती वाया जात आहे. देशाचे युवक आता नोकरी करत नाही तर मोबाईलवर इन्स्टाग्राम, सोशल मीडिया बघतो. हे वास्तव आहे. शेतकरी, युवकांवर आक्रमण सुरु आहे आणि दुसरीकडे दोन तीन उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांचा फायदा दिला जातोय”, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी आणखी काय-काय म्हणाले?

“काही दिवसांपूर्वी माझ्याकडे काही युवक आले आणि म्हणाले, अग्निवीर योजना आधी आम्हाला आर्मीत घेतलं गेलं होतं. १ लाख ५० हजार जवानांना भारतीय सैन्याने स्वीकारलं होतं. त्यांनी फिजिकल टेस्ट पास केली होती. मोदी सरकारने अग्निवीर योजना लागू केली आणि या सर्व युवकांना त्यांनी आर्मीत येऊ दिलं नाही. देशप्रेमाची भावना होती. ते माझ्यासमोर रडत होते. अश्रू येत होते. म्हणत होते, सरकारने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आमची मस्करी केली जाते. गावात आम्हीला खोटे सैनिक म्हटलं जातं. थोडीसुद्धा इज्जत ठेवली नाही. त्यांना अग्निवीर योजनेतही येऊ दिलं नाही. बाहेर उचलून फेकून दिलं आणि म्हणतात आम्ही देशभक्त आहोत. याने देशाचा फायदा होणार नाही.”

“संपूर्ण फायदा, देशाचं धन मोजक्या लोकांच्या हातात जात आहे. मी संसदेत भाजपच्या लोकांना विचारलं, हिंदुस्तानला 90 लोकं चालवतात. आयएएस अधिकारी आहेत. मी विचारलं, यापैकी ओबीसी, दलित, आदिवासी किती आहेत? भाजपचे लोक गप्प झाले. ओबीसीची कमीत कमी २० टक्के लोकसंख्या आहे, दलित १५ टक्के, आदिवासींची १२ टक्के लोकसंख्या आहे. ९० पैकी ३ अधिकारी ओबीसी समाजाचे आहेत. त्यांना कोपऱ्यात बसवतात, छोटे-छोटे विभाग देतात. भारतातील मोठ्या कंपन्या काढा आणि त्यात ओबीसी, दलित, आदिवासी समाजाचं कोण आहे ते दाखवून द्या. प्रत्येक क्षेत्रात हीच अवस्था आहे. त्यामुळे जातीय जनगणना झाली पाहिजे.”

‘आमचं सरकार येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू’

“मी मागणी केली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचे बोल बदलले. भारतात एकच जात आहे ती म्हणजे गरीब. एकच जात आहे तर तुम्ही ओबीसी कसे आहात? आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा जातीय जनगणना करुन दाखवू. ही विचारधारेची लढाई आहे. कोट्यवधी लोकांना भाजप सरकारने गरिबीत ढकललं आहे. जे काम आम्ही मनरेगाच्या मदतीने केलं ते या लोकांनी सर्व संपवून टाकलं. आम्हाला दोन हिंदुस्तान नकोय, एक हिंदुस्तान अरबपतींचा, खोट्या स्वप्नांचा असेल, त्यात काही तथ्य नाही. देशाचे जवान सोशल मीडियाने जगू शकत नाही. त्यांना रोजगार हवा आहे. हे काम फक्त इंडिया आघाडी करु शकते. कारण या कामासाठी देशाचा आवाज ऐकावा लागेल.”

“द्वेष दूर करावा लागेल. देशाला जोडून पुढे जावं लागेल. आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चाललो, चार हजार किमी चाललो. द्वेषाच्या बाजारात तुम्ही प्रेमाचं दुकान खोलू इच्छूक असाल तर तुम्ही काँग्रेसी आहात. मी महाराष्ट्राच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, कारण तुम्ही स्पेशल आहात, मी भारत जोडो यात्रेच महाराष्ट्रात आलो तेव्हा मी विचार केला ही काँग्रेसची जमीन आहे. इथे लोकांना न समजवता विचारधारा समजते. त्यामुळे आम्ही आज महाराष्ट्रात आलो आहोत. तुम्ही गब्बर शेर आहात. तुम्हाला कुणालाच घाबरायचं कारण नाही. तुमची विचारधारेची, मनाची लढाई आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात निवडणूक जिंकणार आहोत.”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.