Video : Nagpur Congress : दिल्लीत राहुल गांधींची ईडी चौकशी, नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांच्या बॅरिकेट्स तोडून उड्या

. भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ईडीचा दुरुपयोग थांबवावा, ही आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. काही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्या त्यांच्या भावना होत्या. राहुल गांधींना जेलमध्ये टाकत असाल तर आम्हीसुद्धा जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत.

Video : Nagpur Congress : दिल्लीत राहुल गांधींची ईडी चौकशी, नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, कार्यकर्त्यांच्या बॅरिकेट्स तोडून उड्या
नागपुरात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमकImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:37 PM

नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपूर, पुणे, औरंगाबादेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट पाहायला मिळाली. काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) कार्यकर्त्यांना समजावून सांगत होते. आमदार अभिजीत वंजारी (Abhijeet Vanjari) हेही आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्ते (activists) पोलिसांशी बाचाबाची करताना दिसून आले.

पाहा व्हिडीओ

मोदी सरकारच्या आघाताला प्रत्यूत्तर

आमदार अभिजीत वंजारी म्हणाले, नवी दिल्लीत दहा जनपथला जाऊन काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बळजबळीनं पकडण्यात आलं. छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोदी सरकार आमच्यावर आघात करत आहे. त्याचं प्रत्यूत्तर देण्यासाठी आम्ही उभे आहोत. यावेळी नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बॅरिकेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. आमदार अभिजित वंजारी आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याही या आंदोलनात सहभागी झाल्या.

हे सुद्धा वाचा

तर आम्हालाही जेलमध्ये टाका – ठाकरे

काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांना रोज ईडी कार्यालयात बोलावून बसवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळं देशभरातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाचं नुकसान होऊ नये. मारपीट होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं ठाकरे म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ईडीचा दुरुपयोग थांबवावा, ही आमची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. काही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्या त्यांच्या भावना होत्या. राहुल गांधींना जेलमध्ये टाकत असाल तर आम्हीसुद्धा जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.