नागपुरात संविधान दिनी राष्ट्रभक्तीची रांगोळी, विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी उधळले रंग
रांगोळी स्पर्धा केवळ सौंदर्यकृती नसून मूल्यांची रुजवणूक करणारा अभिनव उपक्रम आहे, असे गौरवोद्गार रांगोळी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र ढवळे यांनी काढले.
भारतीय संविधान व राष्ट्रभक्ती या विषयावरील रांगोळी स्पर्धा नरसाळ्यातील श्री सत्यसाई विद्या मंदिरात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी संविधान दिनानिमित्त घेण्यात आली.
Follow us on
नागपुरातल्या श्री सत्य साई विद्या मंदिर शाळेत भारतीय संविधान व राष्ट्रभक्ती या विषयावरील रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, असा त्यामागचा उद्देश होता. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यावेळी रंगांची उधळण करत राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली.
विद्यार्थ्यांना मनात भारतीय संविधानाच्या मूल्यांची व तत्वाची ओळख करून देणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे हा या रांगोळी उपक्रमामागचा मूळ उद्देश होता.
संविधानावरील रांगोळी स्पर्धेत शिक्षक गटात संजय खंडार, प्रफुल देवतळे व शीतल राठोड यांनी रेखाटलेली रांगोळी सर्वोत्कृष्ट ठरली.
रांगोळी स्पर्धा केवळ सौंदर्यकृती नसून मूल्यांची रुजवणूक करणारा अभिनव उपक्रम आहे, असे गौरवोद्गार रांगोळी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र ढवळे यांनी काढले. संविधान दिनाच्या निमित्तानं शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली.
विद्यार्थ्यांबरोबर आम्हाला संधी देऊन विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रमूल्य जोपसण्यासाठी आमचाही हातभार लागला याबद्दल पालकांनी शाळेचे कौतुक केले. पालक गटात हेमंत दरवई, सविता जयवंतकर व योगिता ताजनेकर यांची रांगोळी सर्वोत्कृष्ट ठरली.
स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध चित्रकार व रांगोळी कलाकार हर्षन कावरे व सुमित ढोरे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे संचालक नरेंद्र ढवळे, डॉ. राजेंद्र वाटाणे, मुख्याध्यापक निलेश सोनटक्के, रश्मी वाटाणे, स्नेहल बांगरे उपस्थित होत्या.