नागपुरात ज्येष्ठ नागिराकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेची नोंदणी, दिव्यांग व्यक्तींसाठीही तपासणी
नागपूर जिल्ह्यामध्ये तालुका निहाय शिबिरे 4 एप्रिल 2022 पासून सुरु होत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व दिव्यांग बांधवांनी होणाऱ्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सी.आर.सी, नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी केले आहे.
नागपूर : केंद्र शासनाच्या एडीआयपी (ADIP) योजने अंतर्गत आणि राष्ट्रीय वयोश्री योजने राबविली जाते. याअंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत एडीआयपी योजना ही दिव्यांग व्यक्तीसाठी आणि राष्ट्रीय वयोश्री योजना ही 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, (दिव्यांगजन), (सी.आर.सी–नागपूर) ALIMCO, जिल्हा प्रशासन, जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद, नागपूर आणि नागपूर महापालिका (NMC) यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तीकरिता ADIP तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक साहित्याच्या वाटपाकरिता नोंदणी व तपासणी केली जात आहे. तपासणी शिबिर 27 फेब्रुवारी 2022 पासून सुरु झाले आहेत. 20 मार्च 2022 पर्यंत नागपूर महापालिका झोन निहाय शिबीर समाप्त होणार आहेत.
सुरेश भट सभागृहात तपासणी शिबीर
त्यानंतर 22 मार्च ते 31 मार्च 2022 तपासणी शिबीर कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे सुरु होणार आहे. नागपूर महापालिका झोन निहाय शिबिरामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांची तसेच दिव्यांग बांधवांची नोंदणी व तपासणी झाली नसेल. त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व दिव्यांग बांधवानी सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणाऱ्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा. नागपूर जिल्ह्यामध्ये तालुका निहाय शिबिरे 4 एप्रिल 2022 पासून सुरु होत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व दिव्यांग बांधवांनी होणाऱ्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सी.आर.सी, नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे यांनी केले आहे.
लाभार्थी पात्रता निकष
दिव्यांगजन दिव्यांगत्व 40 % व त्यापेक्षा अधिक, वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजारांपेक्षा पेक्षा कमी असावे. ज्येष्ठ नागरिक वय पात्रता 60 वर्षापेक्षा जास्त असावे. तसेच वार्षिक उत्पन्न 1 लाख 80 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र/UDID कार्ड (अनिवार्य), आधार कार्ड, रेशनकार्ड/उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो -2.