MLC election | कोटा कोण पूर्ण करणार? अकोला आणि नागपूर विधान परिषद निवडणुकीचा उद्या निकाल
नागपुरात काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख पहिल्या पसंतीची मते मिळवून कोटा पूर्ण करतात की, चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र पालटवतात, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
नागपूर/अकोला : विदर्भासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विधान परिषदांच्या दोन जागांची मतमोजणी होणार आहे. अकोला-वाशिम-बुलडाणा आणि नागपूर विधान परिषदेतून कोण बाजी मारतो, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नागपुरात तीन उमेदवार असले, तरी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. तर अकोल्यात गोपीकिशन बाजोरिया आणि वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. उद्या दुपारनंतर मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल.
बावनकुळे, देशमुख की भोयर?
नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मंगळवारी मतमोजणी होणार आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवनमध्ये मतमोजणी तयारी पूर्ण झालीय. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार. दुपारी १२ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. चार टेबलवर ही मतमोजणी पार पडेल. बचतभवनमध्ये मतमोजणी तयारी पूर्ण झालीय. परिसरात चोख पोलीस बंदोबस्त असून, संपूर्ण परिसरावर २४ तास सीसीटीव्हीचा वॅाच आहे. या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख मैदानात आहे. काँग्रेसने वेळेवर उमेदवार बदलल्याने, ही निवडणूक राज्यात चर्चेचा मुद्दा ठरलीय. दरम्यान, सोमवारी मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिरात चंद्रशेखर बावनकुळे यांची पूजा केली.
गोपीकिशन बाजोरिया की, वसंत खंडेलवाल?
अकोला विधान परिषदेच्या अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 10 डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. एकूण पाच टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 22 केंद्रावरून जमा केलेल्या 22 मतपेट्यांची याठिकाणी मतमोजणी होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्के बजाविला. उद्याला कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी बाजोरिया निवडून आले तर बाजोरीयांची चौथ्यादा निवडूण येतील. जर बाजोरिया यांचा पराभव होऊन वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला तर पाहिल्यांदा विधान परिषदेमध्ये कमळ फुलेल. यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचे कक्ष लागले आहे. उद्याला दुपारी 12 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.