AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सुबुद्धी मिळाली असती तर मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Sanjay Raut on Devendra Fadnavis : नागपूरची माती आणि वातावरण चांगलं आहे. राऊतांनी वारंवार विदर्भात येईल. त्यामुळे त्यांना कदाचित सुबुद्धी सूचेल.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सुबुद्धी मिळाली असती तर मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
अडीच वर्षापूर्वी तुम्हाला सुबुद्धी मिळाली असती तर मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांवर पलटवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 1:29 PM

नागपूर: नागपूरची माती आणि वातावरण चांगलं आहे. राऊतांनी वारंवार विदर्भात येईल. त्यामुळे त्यांना कदाचित सुबुद्धी सूचेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)  यांना लगावला होता. त्यावर राऊतांनी पलटवार केला हे. फडणवीस नागपूरचे (nagpur) सुपुत्र आहेत. त्यांना काल तुम्ही लोकांनी प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूरमध्ये आल्यावर राऊतांना सदबुद्धी मिळेल. आम्हाला सुबुद्धी मिळेल असं वाटतं तर तुम्हाला का नाही मिळाली? तुम्हाला अडीच वर्षापूर्वी मिळाली असती तर देशाचं राज्याचं राजकारण वेगळ दिसलं असतं. कदाचित तुम्ही मुख्यमंत्री असता, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. तुम्ही मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हाला सदबुद्धीचं अजीर्ण झालं. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची युती झाली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे आमची बुद्धी आण सद्धबुद्धी आम्हाला ईश्वराने दिली आहे. त्यानुसार आम्ही काम करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

संजय राऊत नागपूरमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा टोला लगावला. यावेळी त्यांनी इंडियन बार कौन्सिलने पाठवलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली. मला कोर्टाचा सामना करावा लागत आहे. दिलासा घोटाळा कोर्टात सुरू आहे. केवळ एकाच विचारधारेच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दुसऱ्यांना मिळत नाही. देशाच्या न्यायव्यवस्थेत असं होत आहे. याबाबत माझ्याविरोधात इंडियन बार कौन्सिलने याचिका दाखल केली आहे. मी त्याला उत्तर देईन, असं राऊत म्हणाले.

वीज चोरीची चौकशी करू

तुमच्या कालच्या नागपूरच्या सभेत वीज चोरी झाली होती. त्यावरही त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, मला लक्षात आलं. काही चित्रं दाखवलं. त्यावर आम्हीच चौकशी करू. पक्षांतर्गत चौकशी समिती नेमू आणि हा प्रकार कुणामुळे घडला याची चौकशी करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत

यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांवर टीका केली. या स्टंटने फरक पडत नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईतलं पाणी माहीत नाही, करू द्या त्यांना स्टंट. आमचे शिवसैनिक सक्षम आहे. हनुमान चालिसा वाचणं. रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. अलिकडे भाजपने नौटंकी केली आहे. त्या स्टंटमधील पात्र आहेत. लोकं यांना सीरियसली घेत नाहीत. आम्ही सर्व सण साजरे करतो. यांचा हिंदुत्वाला संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही उत्सव साजरा करतोय. शोभायात्रा काढतोय. हे काय आम्हाला शिकवतात यांना स्टंट करू द्या, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut on Navneet Rana: भाजपला मार्केटिंगसाठी सी ग्रेड स्टार लागतात, राऊतांचा राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है

Maharashtra News Live Update : रवी राणा नवनीत राणा मुंबईत दाखल, पोलिसांकडून दाम्पत्याचा शोध

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.