नागपूर: नागपूरची माती आणि वातावरण चांगलं आहे. राऊतांनी वारंवार विदर्भात येईल. त्यामुळे त्यांना कदाचित सुबुद्धी सूचेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला होता. त्यावर राऊतांनी पलटवार केला हे. फडणवीस नागपूरचे (nagpur) सुपुत्र आहेत. त्यांना काल तुम्ही लोकांनी प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूरमध्ये आल्यावर राऊतांना सदबुद्धी मिळेल. आम्हाला सुबुद्धी मिळेल असं वाटतं तर तुम्हाला का नाही मिळाली? तुम्हाला अडीच वर्षापूर्वी मिळाली असती तर देशाचं राज्याचं राजकारण वेगळ दिसलं असतं. कदाचित तुम्ही मुख्यमंत्री असता, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. तुम्ही मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हाला सदबुद्धीचं अजीर्ण झालं. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची युती झाली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे आमची बुद्धी आण सद्धबुद्धी आम्हाला ईश्वराने दिली आहे. त्यानुसार आम्ही काम करतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊत नागपूरमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा टोला लगावला. यावेळी त्यांनी इंडियन बार कौन्सिलने पाठवलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली. मला कोर्टाचा सामना करावा लागत आहे. दिलासा घोटाळा कोर्टात सुरू आहे. केवळ एकाच विचारधारेच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दुसऱ्यांना मिळत नाही. देशाच्या न्यायव्यवस्थेत असं होत आहे. याबाबत माझ्याविरोधात इंडियन बार कौन्सिलने याचिका दाखल केली आहे. मी त्याला उत्तर देईन, असं राऊत म्हणाले.
तुमच्या कालच्या नागपूरच्या सभेत वीज चोरी झाली होती. त्यावरही त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, मला लक्षात आलं. काही चित्रं दाखवलं. त्यावर आम्हीच चौकशी करू. पक्षांतर्गत चौकशी समिती नेमू आणि हा प्रकार कुणामुळे घडला याची चौकशी करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यांवर टीका केली. या स्टंटने फरक पडत नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईतलं पाणी माहीत नाही, करू द्या त्यांना स्टंट. आमचे शिवसैनिक सक्षम आहे. हनुमान चालिसा वाचणं. रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. अलिकडे भाजपने नौटंकी केली आहे. त्या स्टंटमधील पात्र आहेत. लोकं यांना सीरियसली घेत नाहीत. आम्ही सर्व सण साजरे करतो. यांचा हिंदुत्वाला संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही उत्सव साजरा करतोय. शोभायात्रा काढतोय. हे काय आम्हाला शिकवतात यांना स्टंट करू द्या, असं संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है
Maharashtra News Live Update : रवी राणा नवनीत राणा मुंबईत दाखल, पोलिसांकडून दाम्पत्याचा शोध