देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की? संजय राऊत यांचा धक्कादायक दावा

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खासदार संजय राऊत यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केलाय. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की? संजय राऊत यांचा धक्कादायक दावा
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 11:28 PM

नागपूर | 17 ऑक्टोबर 2023 : नागपुरात पोलीस उपायुक्तांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आलीय. धक्काबुक्कीचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय. हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केलीय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उपायुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली जाऊ शकते? अशी चर्चा सुरु आहे. या घटनेवरुन संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

“हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट : नागपूर, उपमुखयमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्का बुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता”, असं म्हणत संजय राऊत यांनी व्हिडीओ ट्विट केलाय.

‘बातमी दाबण्याचा प्रयत्न केला गेला’

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. “गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्यात खात्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की केली जाते, मग भाजपकडून सर्वसामान्य नागरिकांवर काय अत्याचार होत असेल याचा हा पुरावा आहे. आज सकाळपासून ही बातमी दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय”, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

‘देवेंद्र फडणवीस वारंवार तोंडघशी पडत आहेत’

“अधिकाऱ्यांवर काय पद्धतीने अशी अरेरावी केली जाते, मागे शिंदे गटाच्या एका लोकप्रतिनिधीने डॉक्टरांना चक्क शौचालय साफ करायला लावलं, तर आता भाजपच्या एक पदाधिकारी उपायुक्त पदाच्या अधिकाऱ्यासोबत अशी गुंडागिरी केली जात असेल तर सर्वसामान्यांवरील दादागिरी काय असेल? देवेंद्र फडणवीस वारंवार तोंडघशी पडत आहेत. ते वारंवार गृहमंत्री म्हणून कमी पडताना दिसत आहेत. याचे हे पुरावे आहेत”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Non Stop LIVE Update
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?.
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके.
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?.