Vidarbha School | विदर्भातील शाळा 29 जूनपासून, विद्यार्थ्यांना घेता येणार मोकळा श्वास; 27, 28 जूनला होणार शाळेत स्वच्छता

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार म्हणाल्या, शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आलं होतं. शासनानं 29 जूनपासून पूर्ण वेळेत शाळांचे वर्ग भरविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पहिल्याच दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचनाही केल्यात. त्यासंदर्भातील निर्देश शिक्षण सभापतींच्या बैठकीतून गट शिक्षणाधिकार्‍यांना गुरुवारच्या बैठकीतून देण्यात आल्या.

Vidarbha School | विदर्भातील शाळा 29 जूनपासून, विद्यार्थ्यांना घेता येणार मोकळा श्वास; 27, 28 जूनला होणार शाळेत स्वच्छता
शिक्षक 27 तर विद्यार्थी 29 जूनपासून शाळेत
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 10:08 AM

नागपूर : विदर्भातील शाळा केव्हापासून सुरू होणार याबाबत संभ्रम होता. तो संभ्रम आता दूर झाला आहे. 10 जून रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या पत्रान्वये विदर्भातील शाळांकरिता 27 आणि 28 जून 2022 रोजी येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना उपस्थित राहायचे आहे. दोन दिवस शाळेची स्वच्छता (Sanitation) करावयाची आहे. पण, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकरिता शाळा ही बुधवारी, 29 जूनपासून सुरू होणाराय. विदर्भातील तापमान जास्त असल्यानं शाळा उशिरा सुरू होतात. राज्य शासनाच्या अखत्यारित शाळा 27 जूनपासून सुरू करण्याचे पूर्वनियोजित होते. त्यासंदर्भातील सर्व सूचनाही शहरासोबतच ग्रामीण भागातील शाळांनी पालकांना (Parents) यापूर्वीच केल्या होत्या. तसे पत्रही 9 जून रोजी शिक्षण आयुक्तालयाकडून जारी झाले होते. शाळा 29 जूनपासून सुरू होणार असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी (Education Officer) सांगितलं.

शिक्षक-पालकांमधील संभ्रम दूर

दोन पत्र निघाल्यानं गोंधळ उडाला होता. सुरुवातीला निघालेल्या पत्रानुसार, 24 ते 25 जूनदरम्यान सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे. शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कोविड-19 प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन करावे. अशा सूचना मिळाल्या होत्या. 28 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत बोलवावे. असं ठरलं होतं. पण, 10 जून रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक पत्र जारी केले. त्यामध्ये त्यांनी विदर्भातील शाळांकरिता 27 आणि 28 जून रोजी येथील शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे. शाळेची स्वच्छता करावी, शाळेचे सौंदर्यीकरण करावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे कोविड-19 प्रादुर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींच्या अनुषंगाने उद्बोधन करावे. 29 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत बोलवावे, असे नमूद केले आहे. यामुळे पालक व शिक्षकांमध्ये संभ्रम पसरला होता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाकडे मार्गदर्शन मागविले. त्यानंतर शासनाकडून 29 जूनपासून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकरिता शाळांचे वर्ग भरणार आहेत. आता पालक व शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर झाला आहे.

शिक्षक 27 तर विद्यार्थी 29 जूनपासून शाळेत

यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार म्हणाल्या, शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आलं होतं. शासनानं 29 जूनपासून पूर्ण वेळेत शाळांचे वर्ग भरविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच पहिल्याच दिवशी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचनाही केल्यात. त्यासंदर्भातील निर्देश शिक्षण सभापतींच्या बैठकीतून गट शिक्षणाधिकार्‍यांना गुरुवारच्या बैठकीतून देण्यात आल्या. 27 आणि 28 जून रोजी शिक्षकांना शाळेत हजर राहायचं आहे. प्रवेशोत्सवाची तयारी करण्यासोबतच शाळेची भौतिक सुविधा, निर्जंतुकीकरण आदी कामे करून घ्यायची आहेत.

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.