Science Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान!; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड

विज्ञान कुठल्याही परिस्थितीत शिकविता येते. त्यासाठी प्रयोगशाळा असलीच पाहिजे असं नाही. शिकणारे विद्यार्थी हे कुठल्या परिस्थितीत आहेत, हे महत्त्वाचं, असं मत नागपूर मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी व्यक्त केलं.

Science Teacher | प्रयोगशाळा नसतानाही शिकविता येते विज्ञान!; नागपुरातील मनपा शाळेतील शिक्षिकेला विज्ञानातील सर्वोच्च अवॉर्ड
मनपा शाळेतील शिक्षिका दीप्ती बिस्ट
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 6:53 AM

नागपूर : साराभाई टीचर्स सायंटिस्ट अवॉर्ड 2021 (Sarabhai Teachers Scientist Award 2021)साठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा केंद्र सरकारच्या सायंस अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट, रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन, नॅशनल काउंसिल ऑफ टीचर्स सायंटिस्ट, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल काउंसिल ऑफ यंग सायंटिस्ट या संस्थांद्वारे घेण्यात आली. बावीस राज्यांतून हजारो शिक्षकांनी भाग घेतला. सुरुवातीला शंभर गुणांचा ऑनलाईन पेपर घेण्यात आला. त्यातून पहिल्या पंचवीस जणांची मेरीट यादी काढण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात प्रोफाईल अपलोड करायची होती. त्याची स्क्रुटीनी झाल्यानंतर पहिल्या दहा जणांची यादी तयार करण्यात आली.

हजारो विज्ञान शिक्षकांमधून पटकावले अव्वल स्थान

तिसऱ्या टप्प्यात प्रोफाईल प्रेझेंटेशन आणि ज्युरीसमोर प्रश्नोत्तरे झाली. त्याचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये नागपूर महापालिकेतील शिक्षिका दीप्ती बिस्ट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दीप्ती या सुरेंद्रगड हिंदी हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षिका आहेत. 2021 चा साराभाई टीचर्स सायंटिस्ट अवॉर्डसाठी दीप्ती बिस्ट यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत दीप्ती बिस्ट ?

नासाच्या मंगळ ग्रहावर सोडलेल्या यानावर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे नाव दीप्ती यांनी इन्स्पायरमध्ये विज्ञान प्रदर्शनात त्यांनी तयार केलेल्या प्रयोगांना राष्ट्रीयस्तरावर निवडण्यात आले. नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळाव्यात त्या रिसोर्स पर्सन म्हणून जबाबदारी सांभाळतात. नो कास्ट लो कास्ट सायन्सच्या त्या एक्सपर्ट आहेत. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या फॅमटो सॅटेलाईट लाँचिंगमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांचे नेतृत्व त्यांनी केले होते. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून भरपूर पैसे घेऊन विज्ञान शिकविले जाते. पण, कमी खर्चातही विज्ञान शिकविता येते. हे दीप्ती बिस्ट यांनी त्यांच्या उदाहरणावरून शिकविले. त्यामुळं दीप्ती यांच्याकडून नागपूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांनी धडे घेण्याची गरज आहे.

Dam water| आनंदाची बातमी! राज्यात यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई नाही; धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा

Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?

Gadchiroli Election | धर्मरावबाबा, अमरीशरावांच्या अहेरीत आदिवासी विद्यार्थी संघटनेची एंट्री, महाविकास आघाडीचे वर्चस्व

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.