पूर्व विदर्भात विजेचा कहर, वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा घेतला बळी

हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.

पूर्व विदर्भात विजेचा कहर, वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा घेतला बळी
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 7:09 PM

नागपूर : पूर्व विदर्भात विजांचा कडकडाट सुरू आहे. आज दिवसभरात वीज पडून सात जणांचा बळी गेला. काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. काही भागात ढगाळलेले वातावरण आहे. वीज पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या दरम्यान वीज पडून चार वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच मृत्यू झाला. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना प्रकाश झोडे आणि श्रीमती परसोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या घटनेत कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला.

चंद्रपुरात उद्या रेड अलर्ट

चौथ्या घटनेत गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.

आर्वीत पाच महिला जखमी

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे राहणार आर्वी असं मृत महिलेचं नाव आहे. पाच महिलांना विजेची आस लागली. विजेची आस लागलेल्या महिलांवर गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना ही घटना घडली.

महागाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता होती. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान महागाव येथील शेतकरी शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके वय 54 वर्ष राहणार महागाव असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.