Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला झाला.त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा अमरावती येथे होत आहे.

Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना
शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागतImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:37 AM

नागपूर : नागपुरात विमानतळावर (Nagpur airport) चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आहेत. मोठ्या संख्येने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. कुणालाही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जवळ जाऊ दिलं जात नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP activists) पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार हे गाडीत बसले. अमरावतीच्या दिशेने रवाना झालेत. नागपूर-अमरावती या मार्गावरही चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला झाला.त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा अमरावती येथे होत आहे.

विदर्भात 62 पैकी फक्त सहा आमदार राष्ट्रवादीचे

वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार हेसुद्धा या दौऱ्यासाठी रवाना झालेत. पश्चिम विदर्भात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विदर्भात 62 पैकी फक्त सहा विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीची ताकद वाढविता येईल, यासाठी मोठे नेते पवारांसोबत आहेत. अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

संघटनात्मक मजबुतीसाठी दौरा महत्वाचा

संघटनात्मक मजबुतीसाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. अमरावतीच्या दिशेनं गाड्यांचा ताफा रवाना झालाय. नागपूर ते अमरावती या रस्त्यावरी महत्वाच्या चौकात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अनुचित घटनेसारखी घटना घडून नये, यासाठी पोलीस तैनात आहेत.

अमरावतीत 350 पोलीस तैनात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अमरावतीच्या दिशेने रवाना झालेत. पवारांच्या सुरक्षेसाठी सहा जिल्ह्यातील पोलीस अमरावतीत दाखल झालेत. अमरावती शहरात अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर ग्रामीणमधील पोलीस दाखल झालेत. 15 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस उपनिरीक्षक यांच्या सह 350 पोलीस राहणार तैनात आहेत. शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सहा ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Devendra Bhuyar | डॉक्टर अनिल बोंडे 3-4 वाजतानंतर शुद्धीवर नसतात; अमरावतीत देवेंद्र भुयार यांची खोचट टीका

Amravati NCP | राष्ट्रवादीचा उद्या अमरावतीत मेळावा, शरद पवार उपस्थित राहणार, देवेंद्र भुयार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Video Nagpur Police | आमदार आशिष जैसवाल यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; वाहतूक पोलिसांना सुनावले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.