Nagpur Shiv Sena | भाजपच्या गडात शिवसेनेचे मिशन महापौर; नागपूर मनपामध्ये सेनेची सर्व जागांवर लढण्याची तयारी
भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरात शिवसेनेनं मिशन महापौर सुरू केलंय. आगामी नागपूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं जय्यत तयारी सुरू केलीय. यासाठी विशेष रणनीती आखली जातेय.
नागपूर : सध्या भाजप आणि सेनेत विस्तव ही जात नाही इतके संबंध ताणले गेलेत. त्यामुळं भाजपला मात देण्यासाठी सेना कामाला लागली आहे. नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी सेनेनं रणनीती आखलीय. प्रत्येक वॉर्डामध्ये शाखा सुरू केली. कार्यकर्ते जोडण्याचं काम सुरू आहे. लोकांचं काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना (Notice to activists) देण्यात आल्याय. विशेषतः सामाजिक विषय हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आघाडी झाली तर ठीक नाहीतर सर्व जागांवर लढण्याची तयारी सेनेनं केल्याचं सेनेचे प्रदेश प्रवक्ते किशोर कन्हेरे ( State Spokesperson Kishore Kanhere) सांगितलंय.
शहरात भाजपचं मोठं नेटवर्क
भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरात शिवसेनेनं मिशन महापौर सुरू केलंय. आगामी नागपूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं जय्यत तयारी सुरू केलीय. यासाठी विशेष रणनीती आखली जातेय. सेनेनं नागपुरात मिशन महापौर सुरू केलं असलं तरी हे इतकं सहज नाही. नागपुरात भाजपचं मोठं नेटवर्क आहे. त्या तुलनेत शिवसेना कुठेही नाही. त्यामुळं सेनेच्या या मिशन महापौरला किती यश मिळते हे पाहणं महत्वाचे ठरेल.
काही कार्यकर्ते लागले कामाला
नागपूर शहरात दोन महानगर प्रमुख आहेत. पण, जुने आणि नवीन असा वाद आहे. शिवसेनेचे खासदार नागपुरात तीनदा येऊन गेले. कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी प्राण फुंकले. पण, स्थानिक कार्यकर्त्यांची मनं जुळणं जरा कठीण आहे. अशाही परिस्थिती शिवसेनेला मिशन मनपा करणं जड वाटतं. भाजप, राष्ट्रवादीसोबत आल्यास महाविकास आघाडी मिळून एकत्र निवडणूक लढल्यास भाजपाशी टक्कर देता येईल. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जुळवून घ्यावं लागेल. शिवसेनेचे काही कार्यकर्ते कामाला लागले आहे. पण, काही कार्यकर्ते उमेदवारी मिळेल, तेव्हा पाहू, या पावित्र्यात आहेत. त्यामुळं लोकांची पाहिजे तशी कामे केली जात नाहीत. तुलनेत भाजप, काँग्रेस यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसतं.