शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले…

शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (shivsena leader Sanjay Rathod clarification on harassment allegations)

शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले...
संजय राठोड
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 2:51 PM

नागपूर: शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे. (shivsena leader Sanjay Rathod clarification on harassment allegations)

संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही पत्रकार परिषदेत दिली. राजकारणात विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहेत. राजकारण संपण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणात आपली मोठी रेष न ओढता, दुसऱ्याची रेष छोटी करतात. राजकारणात पाय ओढण्याचा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. मीडिया आणि सोशल मीडियात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजसाठी शहानिशा न करता खोटी बातमी दिली जात आहे. अशा बातम्यामुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. काल एका पत्राचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. ही स्पर्धा जीवघेणी ठरू नये. माध्यमांनी प्रकरण समजून घ्यावं. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रकार आहे, असं राठोड म्हणाले.

प्रकरण कोर्टात प्रलंबित

मी एका संस्थेचा प्रतिनिधी होतो. शिवपुरी येथे या संस्थेच्या माध्यमातून आश्रम शाळा सुरू आहे. या शाळेतील तीन कर्मचारी सातत्याने गैरहरज राहिल्याने त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. हे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्यानंतर संस्थेने मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरती पदे भरण्याची परवानगी घेऊन तात्पुरती पदे भरली. तशी जाहिरात दिली होती. एका शिक्षकाचं प्रकरण झालं. त्याने सहायक आयुक्तांकडे राजीनामा दिला. 13 एप्रिल 2017 मध्ये राजीनामा दिला. नंतर हे प्रकरण नव्हतं. पण नंतर त्या शिक्षकाचे नातेवाईक आले आणि नोकरीवर घेण्याची विनंती होते. पण कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने तुम्हाला नोकरीवर घेऊ शकत नसल्याचं त्यांना मी सांगितलं. हवं तर कोर्टात जा असं त्यांना सांगितलं, असं ते म्हणाले.

त्या संस्थेशी संबंध नाही

मीही त्या संस्थेचा राजीनामा दिला आहे. याप्रकरणी शाळेतील एका शिक्षकाला काही मेसेज आले. त्याचं नावही संजय आहे. आधी संजय नावाच्या माझ्या या सहकाऱ्याला मॅसेज यायचे, नंतर मला पण मॅसेज यायला लागले’ म्हणून आम्ही तक्रार केली होती. मध्यंतरी माझं एक प्रकरण झालं. त्याचा आधार घेऊन काही केल्यास नोकरी मिळेल असा सल्ला त्या लोकांना कुणी दिला असेल. त्यामुळे मलाही मेसेज येणं सुरू केलं. त्यामुळे मीही 28 जुलै 2021 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली, असं त्यांनी सांगितलं. माझ्यावर करण्यात आलेले आरोप नैराश्यातून, मानसिकतेतून करण्यात आली आहे. संस्थेत कामाला लागलो पाहिजे या मानसिकततेतून हा आरोप झाला असेल, असं ते म्हणाले.

राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न

माझ्या शाळेतील कर्मचारी संजय जैस्वाल यांनीही तक्रार केली आहे. पोलिसांनाही त्याची कल्पना आहे. जे काही आहे ते तपासातून पुढे येणारच आहे. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या प्रकरणात माझी ही बाजू यावी म्हणून मी समोर आलोय, असं सांगतानाच एखाद्या प्रकरणात टार्गेट करून मागे लागण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मी 30 वर्षापासून राजकारणात आहे. पण असे आरोप करून राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकरणातही मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, असं ते म्हणाले.

मी रडणारा नाही, लढणारा

मी रडणारा नाही, लढणारा आहे. त्यामुळे मी त्याचा सामना करेल. सुपारी घेऊन मागे लागण्याचा प्रयत्न झाला. कालपासून आरोप सुरू आहे. कोरड्या झाडाला कोणी गोटे मारत नाही. फळाने भरलेल्या झाडालाच गोटे मारतात. माझी काम लोकांना माहीत आहे. मीडियाला माहीत आहे, असंही ते म्हणाले.

पाच नंबरवरून धमक्या

मला अनोळखी नंबरवरुन धमक्या दिल्या गेल्या. माझं राजकीय आयुष्य संपवण्याची धमकी आली होती. त्याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. मला पाच मोबाईल नंबरवरुन धमकी देण्यात आली आहे. हे नंबर पोलिसांना दिले असून चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व फॉरवर्डेड मेसेज आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तिला कोणी तरी मेसेज लिहून देत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच तुमचं करिअर संपवण्यासाठी विरोधकांची साथ घेऊ असंही मेसेजमध्ये म्हटलं आहे. मेसेजमध्ये लिहीलं होतं “ तुमच्या राजकीय विरोधकांची मला साथ आहे,” असा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, त्यातून सर्व स्पष्ट होईलच, असंही त्यांनी सांगितलं. माझे राजकीय विरोधक कोण ते तुम्हाला चांगली माहिती आहे. सध्या राजकीय वातावरण सुरू आहे. त्यातून विरोधक कोण? हे सर्वांना माहित आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. (shivsena leader Sanjay Rathod clarification on harassment allegations)

संबंधित बातम्या:

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोलिसात तक्रार

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

Explainer: SEBC आरक्षणामुळे आरक्षणाची सिस्टीमच बदलणार? OBC, एससी, एसटीचा कोटा कमी होणार का? वाचा सविस्तर

(shivsena leader Sanjay Rathod clarification on harassment allegations)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.