VIDEO : शिवसेना आमदाराने अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल फेकल्या

कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेत शेतकऱ्यांना शेती साहित्यासाठी तब्बल तीनपट जास्त किंमत लावली आणि त्या बदल्यात निकृष्ट कृषी साहित्य पुरवठा केला, असा आरोप आशिष जैसवाल यांनी केलाय.

VIDEO : शिवसेना आमदाराने अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल फेकल्या
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 10:19 AM

नागपूर : शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी नागपूर कृषी विभागाच्या आत्मा योजनेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेत शेतकऱ्यांना शेती साहित्यासाठी तब्बल तीनपट जास्त किंमत लावली आणि त्या बदल्यात निकृष्ट कृषी साहित्य पुरवठा केला, असा आरोप आशिष जैसवाल यांनी केलाय. यावर संतापलेल्या आमदार जैसवाल यांनी या योजनेशी संबंधित पाईल कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकत जाब विचारलाय.

कृषी विभागाने 6,500 रुपयांचा पंप थेट 19,000 रुपयांचा दाखवला

नागपूरमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप झालाय. खुल्या बाजारात ज्या कृषी औषध पंपाची किंमत 1800 रुपये आहे तो पंप कृषी विभागाने 6 हजार 500 रुपयांना दिलाय. बाजारात 6 हजार रुपयांना मिळणाऱ्या डिझेल पंपची किंमत 19 हजार रुपये लावलीय. एकूणच अव्वाच्या सव्वा किमती लावून शेतकऱ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य देण्यात आलंय.

सरकारकडून गरिबांसाठी योजना, मात्र अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप

या भ्रष्टाचारावर बोलताना आमदार आशिष जैसवाल म्हणाले, “सरकार गोरगरिबांसाठी योजना आणतंय. आम्ही मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कृषी साहित्य आणि अवजारे 90 टक्के अनुदानावर मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहोत. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदाही झालाय. परंतू यावर्षी शेतकऱ्यांना जे साहित्य द्यायचं होतं त्याची ऑर्डर खनिज प्रतिष्ठानमधून निघाली.

“नियमानुसार शेतकऱ्याने ज्या दुकानात आवडेल त्या दुकानात जावं, साहित्य घ्यावं. त्याचं बिल कृषी विभागाला दाखवल्यानंतर 10 टक्के शेतकऱ्यांचा सहभाग आणि 90 टक्के अनुदान देणं अपेक्षित होतं,” असंही जैसवाल यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

‘निकाल तुमच्या बाजूने येईल 3 लाख द्या’, लाच घेणाऱ्या खासगी एजंटला कोल्हापुरात बेड्या

“असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, मुख्यमंत्र्यांशी बोलणार” निलेश लंकेंच्या भेटीनंतर अण्णा हजारेंचं वक्तव्य

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराच्या चर्चांना पुन्हा जोर, आगामी महापालिका निवडणुकीत काय गणितं बदलणार?

Shivsena MLA Ashish Jaiswal throw files on Agriculture officer table Nagpur

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.