नागपुरात तिसऱ्या लाटेचे संकेत, 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत असतानाच नागपुरात 12 दिवसांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

नागपुरात तिसऱ्या लाटेचे संकेत, 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोना
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 7:08 PM

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे संकेत असतानाच नागपुरात 12 दिवसांच्या बालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या बाळाचा मृत्यू झाला आहे. दगावलेल्या मुलाचे कुटुंब मध्यप्रदेशमधील शिवनी येथील आहे. (Signs of third wave in Nagpur, 12-day-old baby dies due to corona)

बाळाच्या आईची प्रकृती नाजूक होती त्यामुळे तिला नागपूरला आणण्यात आलं होतं. महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती, त्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. 20 जूनला जन्मानंतर मुलाच्या हृदयात दोन छिद्र असल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले. 26 जूनला बाळाला ताप आला, त्यानंतर त्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले. त्यात त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं, मात्र त्यात त्याचा मृत्यू झाला.

हृदयातील 2 छिद्रांमुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत एक हजाराने घट झाली आहे. कालच्या दिवसात 43 हजार 71 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 955 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 71 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 955 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 52 हजार 299 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 5 लाख 45 हजार 433 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 58 हजार 78 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 2 हजार 5 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 85 हजार 350 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 35 कोटी 12 लाख 21 हजार 306 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण –43,071

देशात 24 तासात डिस्चार्ज – 52,299

देशात 24 तासात मृत्यू –955

एकूण रूग्ण –  3,05,45,433

एकूण डिस्चार्ज – 2,96,58,078

एकूण मृत्यू – 4,02,005

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,85,350

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 35,12,21,306

संबंधित बातम्या

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

(Signs of third wave in Nagpur, 12-day-old baby dies due to corona)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.