नागपूरच्या मेडिकलमध्ये वर्षभरात इतक्या शिशूंचा मृत्यू; मेडिकलमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण आहे असे

नागपूर मेडिकलमध्ये २०२० या वर्षांत ९३५३ बालकांचा जन्म झालाय. यापैकी २०५ बालकांचा मृत्यू झालाय. २०२१ या वर्षांत ७४९३ बालकांचा जन्म झालाय. यापैकी १७६ बालकांचा मृत्यू झालाय.

नागपूरच्या मेडिकलमध्ये वर्षभरात इतक्या शिशूंचा मृत्यू; मेडिकलमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण आहे असे
बदनामीच्या भीतीने तरुणीने नवजात बालिकेला फेकले
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 12:56 PM

नागपूर : आधुनिक सुविधा कितीही झाल्या. तर नवजात शिशूंच्या मृत्यूचा आकडा काही कमी होताना दिसत नाही. आधुनिक जीवनशैलीतून नवनवीन आजार तयार होतात. त्यातून मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढतेय. गेल्या तीन वर्षांची नागपूरची आकडेवारी पाहिली तर भयावह परिस्थिती असल्याचे लक्षात येते. नागपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजेच मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरात २३७ नवजात बालकांचा मृत्यू झालाय. मेडीकलमध्ये जन्मलेल्या एकूण नवजात बालकांच्या तुलनेत २०२२ मध्ये २.४६ टक्के शिशूंचा मृत्यू झालाय. मेडिकलमध्ये गेल्या तीन वर्षांत ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झालाय. माहितीच्या अधिकारात हे धक्कादायक वास्तव पुढे आलंय. कोट्यवधी रुपये खर्च करुनंही राज्य सरकारला नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यात अपयश येत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मिळवली आहे.

चिमुकल्यांचा श्वास कोंडतोय

नागपूर मेडिकलमध्ये २०२० या वर्षांत ९३५३ बालकांचा जन्म झालाय. यापैकी २०५ बालकांचा मृत्यू झालाय. २०२१ या वर्षांत ७४९३ बालकांचा जन्म झालाय. यापैकी १७६ बालकांचा मृत्यू झालाय. तर २०२२ या वर्षांत ९६३० बालकांचा जन्म झालाय. यापैकी २३७ बालकांचा मृत्यू झालाय. म्हणजे २०२० ते २०२२ या तीन वर्षांत नागपूर मेडिकलमध्ये तब्बल ६१८ नवजात बालकांचा मृत्यू झालाय. कमी असलेलं बाळांचं वजन, कमी दिवसांचं बाळ, जन्मजात इन्फेक्शन आणि न्यूमोनिया, ही बाळांच्या मृत्यूची प्रमुख कारणं असल्याचं मेडिकलचे तज्ज्ञ डॅाक्टर सांगतात. यामुळे चिमुकल्याचा श्वास कोंडतोय, अशी परिस्थिती आहे.

तज्ज्ञ प्रशिक्षकांची आवश्यकता

मेडिकलमध्ये गंभीर स्वरुपात येणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे. विदर्भातील अतिशय क्रिटिकल केसेस शेवटी मेडिकलमध्ये येतात. विशेषता व्हेंटिलेटरवर येणाऱ्या रुग्णांना वाचवणे कठीण असते. डॉक्टर आणि परिचारिकांना विशेष प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आवश्यक सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचं डॉक्टरांचं म्हणणंय. त्यासाठी शासनाला सुविधा वाढवून द्याव्या लागतील. कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. शेवटची स्टेजवर आलेल्या रुग्णांवर उपचार करणे कठीण असते.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.