भावी मास्तरांची दमछाक, एसटी बंदचा फटका, खासगी वाहनांनी केली लूट

चंद्रपुरात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दुर्गम-अतिदुर्गम भागातून विद्यार्थी आले. परंतु, एसटीच्या संपामुळे त्यांना प्रवासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. बसेस बंद असल्यानं खासगी गाड्या-ट्रॅव्हल्स यांनी मोठी आर्थिक लूट केली.

भावी मास्तरांची दमछाक, एसटी बंदचा फटका, खासगी वाहनांनी केली लूट
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 5:54 PM

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. आज रविवारी शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी)चा पेपर होता. यासाठी भावी मास्तरांनी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या केंद्र गाठण्यासाठी धावाधाव केली. एसटी बंद असल्याचा फायदा खासगी वाहनांनी चांगलाच घेतला. खासगी वाहनांना अक्षरशः भावी मास्टरांची लूट केली.

चंद्रपुरात पोहचले दुर्गम भागातून विद्यार्थी

चंद्रपुरात शिक्षक पात्रता परीक्षेसाठी दुर्गम-अतिदुर्गम भागातून विद्यार्थी आले. परंतु, एसटीच्या संपामुळे त्यांना प्रवासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला. बसेस बंद असल्यानं खासगी गाड्या-ट्रॅव्हल्स यांनी मोठी आर्थिक लूट केली. मानसिक-शारीरिक त्रासानं त्रस्त परीक्षार्थी शहरातील विविध केंद्रांवर कसेबसे गेले. आज दिवसभर जिल्हा प्रशासनानं या प्रवेश परीक्षेसाठी मोठी तयारी केली होती. चंद्रपूर जिल्ह्यात परीक्षेचा पहिला पेपर 15 परीक्षा केंद्रांवर झाला. यात 4,990 परीक्षार्थी बसले, तर दुसऱ्या पेपरसाठी 14 परीक्षा केंद्रांवर 3,975 परीक्षार्थी यांनी नशीब आजमाविले. यावर देखरेख ठेवण्यासाठी 4 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

तीन वेळा पुढे ढकलली होती परीक्षा

सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी बंद असल्याने काही विद्यार्थी परीक्षेला मुकले असल्याची माहिती आहे. 21 नोव्हेंबरला परीक्षेचं नियोजन राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं. आतापर्यंत विविध कारणांमुळे तब्बल तीन वेळा परीक्षा पुढं ढकलण्यात आली होती. खासगी वाहतूक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परवडणारी नव्हती. तरीही बहुतेक विद्यार्थ्यांनी कसेबसे परीक्षाकेंद्र गाठले.

विदर्भातील कर्मचारी संपावर ठाम

एसटीच्या रोजंदारी कर्मचार्‍यांना चोवीस तासात कामावर रुजू होण्याची नोटीस देण्यात आली. तरीही ते कामावर रुजू न झाल्यामुळे त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली, अशी माहिती नागपुरातील विभाग नियंत्रक डी.सी. बेलसरे यांनी दिली. राज्यातील काही जिल्ह्यामधील चालक-वाहक हे कामावर रुजू झाल्याचे सांगण्यात येते. परंतु विदर्भातील कर्मचारी अद्यापही संपावर कायमच आहेत. त्यातच शनिवारी पुन्हा महामंडळाच्यावतीने 10 संपकर्त्या कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये काटोल व गणेशपेठ आगारातील प्रत्येकी पाच कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यासोबतच नागपूर विभागातील एकूण निलंबित कर्मचार्‍यांची संख्या आता 139 वर जाऊन पोहोचली आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत महामंडळाकडून रोजंदारी गट क्र. 1 मधील आणखी 7 कर्मचार्‍यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळं सेवा समाप्त करण्यात आलेल्या एकूण रोजंदारी कर्मचार्‍यांची संख्या आता 57 वर पोहोचली आहे.

राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे नसून महाभकास, भाजपचे नेते आनंदराव राऊत यांचा आरोप

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.