एसटीचे स्टेअरिंग येणार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती; काय आहे परिवहन महामंडळाचा प्लान?

नागपूर विभागात एसटीचा संप असूनही सुरूच आहे. या संपामुळं परिवहन महामंडळानं दुसरा मार्ग शोधला. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी महिला वाहकाच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देण्यात येणार आहे.

एसटीचे स्टेअरिंग येणार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती; काय आहे परिवहन महामंडळाचा प्लान?
नागपूर एसटी महामंडळ
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 7:00 AM

नागपूर : नागपुरात एसटीचे कर्मचारी (ST staff) विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. गेल्या पावणेतीन महिन्यांपासून हे कर्मचारी संप करत आहेत. त्यामुळं अद्यापही एसटीची वाहतूक रुळावर आली नाही. प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामंडळाचाही महसूल बुडत आहे. महामंडळानेही कर्मचार्‍यांविरुद्ध कडक कारवाईची (Strict action) भूमिका घेत कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करणे सुरू केले. त्यानुसार विभागातील बडतर्फ कर्मचार्‍यांची संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. नागपूर विभागात प्रशासकीय 476, कार्यशाळा 530, चालक 752, वाहक 619 असे एकूण 2 हजार 377 कर्मचारी आहेत. आजवर केवळ सुमारे 128 कर्मचारी कामावर परतले. परंतु, मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळं एस प्रशासनानं एसटीचे स्टेअरिंग खासगी चालकांच्या हाती (The steering of ST is in the hands of private drivers) दिले. सोबतच संपकरी कर्मचार्‍यांवर कारवाईचा सपाटाही सुरू ठेवला आहे.

खासगी कंपनीकडून वाहनचालकांची भरती

सुरळीत करण्यासाठी एसटी महामंडळाने आता खाजगी कंपन्याकडून वाहतूक चालकाची भरती केली आहे. परंतु, भविष्यातील तरतूद म्हणून एसटीने एसटीत कार्यरत असलेल्या वाहकांच्या हातातही स्टेअरिंग देण्याची तयारी चालविली आहे. सध्या अशा तीस महिला कर्मचारी यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. महिला चालकाची भरती प्रक्रियेत दोनशे पंधरा महिलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे महिलांचे प्रशिक्षण रखडले होते. दहा महिन्यांपूर्वीच तीस महिलांनी प्रशिक्षणास सुरुवात केली. मार्च-एप्रिलमध्ये एसटीच्या सेवेत महिला रुजू होणार आहेत.

साडेचारशेपैकी सत्तर बस रस्त्यावर

नागपूर शहर व ग्रामिण भागातील आठ आगारातील संपकरी कामावर रुजु न झाल्याने एसटी चालकाची मागणी वाढली आहे. महामंडळाच्यावतीने एक वर्षाचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. त्यातील आठ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अडीच महिन्यांचा कालावधी उरला आहे. हा कालावधी संपल्यानंतर त्यांना जबाबदारी दिली जाईल. नागपूर विभागात सुमारे 450 बसगाड्या आहेत. संपकाळात केवळ सत्तर बस विविध मार्गावर धावत आहेत. 380 बसगाड्या धावण्यासाठी एसटी महामंडळाला खाजगी कंपनी सोबतच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या चालक-वाहकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग द्यावे लागणार आहे.

Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू

Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू

नागपुरात कचरा संकलनात अनियमितता; ए. जी. एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांवर काय कारवाई करणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.