Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडील शिक्षक, एकुलती एक मुलगी; तिच्या एका चुकीच्या निर्णयाने आईवडील ढसाढसा रडले

गौरी ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी. तिचे वडील शिक्षक आहेत. तिची आई गृहिणी आहे. मुलीचे चांगले शिक्षण शिक्षण घ्यावे म्हणून तिच्या पालकांनी तिला नागपूरला पाठवले.

वडील शिक्षक, एकुलती एक मुलगी; तिच्या एका चुकीच्या निर्णयाने आईवडील ढसाढसा रडले
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 8:47 PM

नागपूर : आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी विदर्भातील बहुतेक लोकं मुलांना नागपूरला शिकायला पाठवतात. नागपूर हे शिक्षणाचे हब झाले. नागपुरात बरेच चांगले कॉलेज असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. गौरी सुनील भावेकर ही २१ वर्षीय युवती. मूळची अमरावती जिल्ह्यातल्या धामनगाव रेल्वे तालुक्यातील लुनावतनगर येथील. गौरी ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी. तिचे वडील शिक्षक आहेत. तिची आई गृहिणी आहे. मुलीचे चांगले शिक्षण शिक्षण घ्यावे म्हणून तिच्या पालकांनी तिला नागपूरला पाठवले.

गौरी नागपुरात कॉम्प्युटर सायन्सच्या सेकंड इअरला होती. प्रियदर्शीनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये मैत्रिणींसोबत राहत होती. सेकंड इअरच्या थर्ड सेमिस्टरचा निकाल लागला. यात ती तीन विषयांत अनुत्तीर्ण झाली. तिच्यासोबत आणखी दोन मुली खोली क्रमांक २१३ ए मध्ये राहत होत्य. त्या दोघीही पास झाल्या. पण, गौरीचे तीन विषय राहिल्याने ती नैराश्यात होती.

गौरी रुममध्ये एकटीच होती

रविवारी सायंकाळची वेळी. रात्री आठ वाजताच्या दरम्यान गौरीच्या रुममेट दुसऱ्या खोलीत गेल्या होत्या. गौरी रुममध्ये एकटीच होती. त्यावेळी खोलीत तिने गळफास घेतला. मैत्रिणी परत आल्या तेव्हा हा प्रकार समोर आला. त्यांनी हॉस्टेलच्या वॉर्डनला कळवले. वॉर्डन अर्चना संदेश बुरबुटे यांनी प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

प्रतापनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश कुरसुंगे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवण्यात आला. घटनेची माहिती आईवडिलांना मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

आई-वडिलांच्या अपेक्षा भंग

गौरीच्या आईवडिलांनी नागपुरातील मेडिकल गाठले. दुःखी अंतःकरणाने मुलीचा शेवटचा चेहरा बघीतला. एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी मोठ्या लाडाने तिचे संगोपन केले होते. वडील शिक्षक असल्याने मुलीकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या.

आपली मुलगी पदवी प्राप्त केल्यानंतर आणखी उच्च शिक्षण घेईल. आपल्यापेक्षा मोठी होईल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण, गौरीचा मृतदेह त्यांच्या हाती पडला. यावेळी ते ढसाढसा रडले. मृतदेह घेऊन अमरावतीला परतले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.