अंधेरीतील पोटनिवडणुकीत त्यांना झटका देण्याचं काम, सुधीर मुनगंटीवार म्हणतात,…
वनविभाग हा जरी राज्याचा असला तरी कायदे केंद्र सरकारचे आहेत.
गजानन उमाटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही प्रचंड मतदानानं निवडून येऊ, यात शंका नाही. एकीकडे महाविकास आघाडी ज्यांनी अडीच वर्ष या महाराष्ट्राचे नुकसान केलं. या महाराष्ट्रामध्ये एक दूषित वातावरण तयार केलं. त्यांना झटका देण्याचं काम या अंधेरी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून होईल. भाजप आणि दोन तलवारी आणि ढाल असे मिळून आम्ही निवडणूक येऊ, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
वाघांची संख्या वाढल्यानंतर जंगलाचं क्षेत्र मर्यादित राहिलं. त्यामुळे वाघांना जागा मिळत नाही. वाढलेल्या वाघांना जेरबंद करायच्या आदेश मी दिलेले आहेत. कर्नाटकातून कोल्हापूर आणि विदर्भात हत्तीसुद्धा येऊ लागले आहेत. यासंदर्भात कर्नाटक सरकारशी चर्चा करणे सुरू आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येईल.
वाघ नसलेल्या जंगलामध्ये अधिकच्या वाघांना ठेवण्याची परवानगी जर केंद्र सरकारकडून मिळाली तर वन्यजीव वाघ संघर्ष कमी होईल. वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना किंवा नुकसान झालेल्यांना सर्वाधिक मदत आपण करतो,असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
एकनाथ खडसे यांची सुरक्षा काढली. यावर मुनगंटीवार म्हणाले, आमची ही सुरक्षा मागच्या वेळी काढण्यात आली होती. तेव्हा आम्ही भाष्य केले नाही. कारण आम्हाला याची जाणीव आहे की, या संदर्भात एक समिती आहे. ती समिती या संदर्भात मूल्यांकन करते आणि सुरक्षा देते. राजकारणाचा सुरक्षेशी काही संबंध नाही.
वनविभाग हा जरी राज्याचा असला तरी कायदे केंद्र सरकारचे आहेत. त्यामुळं या कायद्यांमध्ये काही बदल केला तर केंद्राच्या परवानगीशिवाय सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल.
आम आदमीच्या नेतानं पंतप्रधान मोदींच्या आईवर टीका केली. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राजकारणातील ही अतिशय नीच वृत्ती आहे. या देशातील काही लोक विरोधकांवर टीका करताना नीच शब्दाचा प्रयोग करतात.
हे शब्द त्यांच्या नीच मनोवृत्तीचे प्रतीक असते. लोकशाहीमध्ये अशी ही नीच कृती नसावी. अशा शब्दांनी मोदी साहेबांचं कधीही नुकसान झालं नाही. त्यांची उंची ही मोठी आहे, असंही त्यांनी सांगितलं.