Nagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना

घटनास्थळी पोलिसांना एक चिट्टी सापडली. त्यात स्वतःहून आम्ही आत्महत्या करीत आहोत, असं लिहीलं होतं. सोबत एक पाण्याची बॉटल आणि एक विषाची बॉटल मिळाली.

Nagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:44 AM

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील परसोडी/सुंदरी येथे एका शेतात अल्पवयीन प्रेमीयुगलांचे गळफास घेतला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोघेही उमरीतील नम्रता विद्यालयात बाराव्या वर्गात एकाच वर्गात शिकत होते.

शनिवारी सकाळी मुलाचे वडील शेतात गुरांसाठी वैरण आणायला होते, तर त्यांना शेतात त्यांचा मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह आढळले. परसोडी येथील (रोहिणी-बदललेले नाव, वय 17 वर्षे) ही मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. घरी आई, वडील, आजी, आजोबा लहान भाऊ असा मोठा परिवार आहे. सुंदरीतील प्रकाश (बदललेले नाव – वय17 वर्षे ) हा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या घरी वडील, आई, आजी आणि लहान बहीण राहते.

पाण्याची आणि विषाची बॉटली सापडली

घटनास्थळी पोलिसांना एक चिट्टी सापडली. त्यात स्वतःहून आम्ही आत्महत्या करीत आहोत, असं लिहीलं होतं. सोबत एक पाण्याची बॉटल आणि एक विषाची बॉटल मिळाली. त्यांनी नॉयलनच्या बारीक दोरीने गळफास घेतला. सुंदरी गावाच्या पटांगणावर सकाळी चार वाजेपासून सकाळी फिरायला जातात. परसोडी, सौंदड, उमरी, लवारी, सुंदरी, चारगाव या गावातील नागरिक या मोकळ्या परिसरात फिरतात. काही तरुण पोलीस भरतीची तयारी करणारे असतात. मृतक दोघेही एकाच वर्गात शिकत होते. त्यांच्या घरच्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती, असं त्यांचे कुटुंबीय सांगत आहेत.

दोघांच्याही कुटुंबात नव्हता वाद

नॉयलनची बारीक दोरी कुठून आणली हेसुद्धा अद्याप कळले नाही. दोघांच्याही कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वादही नाही. त्यामुळं त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली हे शस्त्रक्रियेनंतरच कळेल. एकंदरित परिस्थिती पाहता त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक संजय खोकले तपास करीत आहेत.

Nagpur fines भीती ओमिक्रॉनची, तरीही विनामास्क वावर, 42 हजार 67 जणांकडून दंड वसूल

Nagpur TB campaign 6 ते 26 डिसेंबरदरम्यान क्षयरुग्ण शोध मोहीम, आशा सेविका देणार भेट

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....