Vidarbha Temperature | विदर्भात उन्हाचे चटके कायम, गोंदियात पारा @45.8 ; उद्याही रेड अलर्ट, मृग लागला तरी पावसाच्या नव्हे घामाच्या धारा!

विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. असं नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिर्देशक मोहन साहू यांनी सांगितलं. सततचा उकाडा आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा यापासून कधी सुटका मिळणार? विदर्भाचं वातावरण थंड होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.

Vidarbha Temperature | विदर्भात उन्हाचे चटके कायम, गोंदियात पारा @45.8 ; उद्याही रेड अलर्ट, मृग लागला तरी पावसाच्या नव्हे घामाच्या धारा!
विदर्भात उन्हाचे चटके कायम
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 6:24 PM

नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भ जून महिन्यात सुद्धा उन्हामुळे होरपळतो आहे. तापमानात वाढ झालीय. अनेक जिल्ह्यात तापमान 45 च्या पार झालं. तर इतर ठिकाणी 43 च्या वरच आहे. मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र अजूनही विदर्भात मान्सूनच वातावरण बनलं नाही. त्यामुळं आणखी काही दिवस विदर्भातील जनतेला उन्हाच्या झळा आणि उकाडा सहन करावा लागणार आहे. साधारणतः 10 ते 15 जूनपर्यंत मान्सूनची वाट पाहावी लागेल, असा सुद्धा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरात 45.4 अंश तापमानाची नोंद झाली. गोंदियात (Gondia) 45.8 अंश डिग्री तापमानाची नोंद झाली. वर्ध्यात 44.8 तापमानाची नोंद झाली. यवतमाळात (Yavatmal) 43.5 अंश डिग्री तापमानाची नोंद झाली. यावरून पूर्व विदर्भात अद्याप उष्णेतेची लाट कायम आहे. मृग नक्षत्र (Monsoon) सुरू झाला, तरी पावसाच्या नव्हे तर घामाच्या धारातच वाहत आहेत.

पावसाच्या धारा केव्हा कोसळणार?

विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. त्यामुळं जून महिना लागला तरी विदर्भातील नागरिकांची उष्ण वारे आणि तीव्र उन्हापासून सुटका नाहीय. उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांमुळे सध्या विदर्भातील तापमान वाढलंय. विदर्भातील काही शहरांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलाय. काही ठिकाणी तापमान 46 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. मे महिना संपला की जून महिन्यात विदर्भातील तापमान कमी व्हायला लागतं. मात्र यंदा जून मध्येही उष्णतेच्या झळा कायम आहे. त्यात मॉन्सूनसाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. त्यामुळं विदर्भातील नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. असं नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिर्देशक मोहन साहू यांनी सांगितलं. सततचा उकाडा आणि सतत वाहणाऱ्या घामाच्या धारा यापासून कधी सुटका मिळणार? विदर्भाचं वातावरण थंड होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.

मृग लागला, आता तरी ये रे पावसा

यंदा पाऊस दहा दिवस अगोदरच येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र त्यांचा अंदाज वरुण राजाने चुकविला. आतापर्यंत पावसाने गोंदिया जिल्ह्यात हजारी लावलेली नाही. सात मेपासून मृग नक्षत्र लागत आहे. किमान आता तरी ये रे पावसा… अशी हाक जिल्हावासी आकाशाकडे बघून मारत आहेत. जिल्हावासियांनी कधी अनुभवला नसावा असा उन्हाळा यंदा पाहिला. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून दिवस निघत गेले तसतसा उन्हाळा वाढत गेल्याचा अनुभव यंदा आला. त्यात मे महिन्याच्या शेवटी नवतपा लागला. तो आता संपूनही गेला. पावसाने एकदाही मनसोक्त अशी हजेरी लावलेली नाही. परिणामी जमिनीची दाहकता कमी झाली नाही. त्यात उन्हाच्या तडाखा जिल्हावासीयांना बसत आहे.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.