एसटीत कामावर परत न येणाऱ्यांचं निलंबन, नागपूर विभागात आणखी 50 जणांची सेवा समाप्त
राज्य परिवहन महामंडळाचं रोज नुकसान होत आहे. बसअभावी प्रवासासाठी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. नागपूर विभागातील 129 वर चालक, वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी संपावर ठामच आहेत.
नागपूर : एसटी कर्मचार्यांचा संप चिघळला आहे. काही एसटीचे चालक-वाहक कामावर परत आले. पण, काही एसटी कर्मचारी कामावर परत येत नाहीत. त्यामुळं नागपूर विभागातील 50 रोजंदारी कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यांना कामावर हजर राहण्याची नोटीस दिली होती. पण, ते कामावर हजर झाले नाही. त्यामुळं ही कारवाई करण्यात आल्याचं विभाग नियंत्रक डी. सी. बेलसरे यांनी सांगितलं.
राज्य परिवहन महामंडळाचं रोज नुकसान होत आहे. बसअभावी प्रवासासाठी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. नागपूर विभागातील 129 वर चालक, वाहकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तरीही काही कर्मचारी संपावर ठामच आहेत.
रोजंदारी कर्मचाऱ्यांचीही बुट्टी
महामंडळातील कर्मचार्यांनी २९ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर संघटनानी संप मागे घेतला. मात्र, काही पुढार्यांनी चिथावल्यामुळे कर्मचारी पेटले आणि चालक वाहकांनी संप कायम ठेवला. ८ नोव्हेंबरपूर्वीपासून विभागातील एसटीच्या १00 टक्के फेर्या बंद आहेत. महामंडळाच्या नागपूर विभागात रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्यांनाही कामावर येण्यापासून रोखण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे.
सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी
एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. प्रवाशांना खासगीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. नागपूर विभागाचे रोज ४८ लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून महामंडळाचे जवळपास ७ कोटींचे नुकसान झाले आहे. रोजचे होणारे नुकसान हे एसटी कर्मचार्यांसाठी घातक ठरत असल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनांमधील पदाधिकार्यांनी दिली.
कामावर रुजू होण्यास नकार
प्रशासनानं संप करणार्या रोजंदारी कर्मचार्यांना २४ तासांची मुदत देत कामावर रुजू होण्याच्या नोटीस दिल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी कामावर रुजू होण्यास नकार दिला. त्यामुळं जवळपास रोजंदारी गट क्र. एकमधील 90 पैकी शुक्रवारी 50 रोजंदारी कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
इतर बातम्या
जिल्हा परिषदेत अधिकारी-पदाधिकाऱ्यांत वाद, कुंदा राऊतांच्या भूमिकेवरून अधिकारी महासंघ आक्रमक