सामाजिक, आर्थिक प्रगती केव्हा होईल?, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं
नित्य नूतन राहावं लागतं. मात्र संस्कृती सोडून चालत नाही.
सुनील ढगे, Tv 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : सरकारच्या नीतीप्रमाणे आपली संस्कृती विदेशात रुजत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की, सामाजिक समता असली पाहिजे विषमता गेली पाहिजे. मात्र विषमता ही आपल्या मनात असते. ती विषमता मनातून गेली पाहिजे. आपले मित्र सगळेच असले पाहिजे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाला काम करावं लागेल. तेव्हाच आपली सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते संघाच्या विजयादशमी सोहळ्यात बोलत होते.
- जनसंख्याची एक समग्र नीती बनविण्याची आवश्यकता आहे. ती समाजातील सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. सगळ्यांसाठी एकच नीती असायला पाहिजे. चीनमध्ये जनसंख्या मोठी होती त्यांनी म्हणून एका संततीला मान्यता दिली. मात्र नंतर समाजात वृद्धांची संख्या वाढली.
- नव दिवस आध्यशक्तीची उपासना केल्यानंतर आपण विजयादशमीसाठी उपस्थित आहोत. शुभ काम करण्यासाठी शक्ती पाहिजे. संघाच्या कार्यक्रमात अशा देशात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कार्यक्रमात बोलविण्याची परंपरा आहे. यावेळी गिर्यारोही संतोष यादव आहेत.
- जगात आपल्या देशाने जी मदत केली त्यातून आपण समोर आलो. जगात आपल्या देशाचे महत्त्व वाढले. खेळाच्या क्षेत्रातसुद्धा आपले खेळाडू पुढे आहेत, हे पाहून छाती भरून येते. नवोथानबद्दल ऐकून खुशी होते.
- आत्मनिर्भय भारत बरोबर आहे. मात्र आत्मा काय आहे याची स्पष्टता पाहिजे. परिस्थितीचा पथ कधीही सरळ नसतो. त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागत. रस्ते काढत असताना त्यात लवचिकता पाहिजे. तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. किती लवचिक व्हायचं हे आपल्याला ठरवून चालावं लागतं, तेव्हाच त्यातून मार्ग मिळतो.
- नित्य नूतन राहावं लागतं. मात्र संस्कृती सोडून चालत नाही. परिवर्तन जगाचा नियम आहे. त्याप्रमाणे चालावं लागते. मात्र त्यावर भटकून चालत नाही. सनातन मूल्य सम्पुष्ठात येऊ नये, यासाठी बाहेरून धोका आहे. तो आपण समजला पाहिजे. बाहेरील शक्ती त्यात बाधा आणते.
- आमच्यात अराजकता पसरविण्याचे काम करते. त्यापासून आपण सावध असलं पाहिजे. आपल्या जाती धर्माच्या नावावर ते आपल्याशी जवळीकता निर्माण करते. आपल्यात फूट पडता कामा नये. आपण सरकारला सहकार्य केले पाहिजे. सावधान राहीलं पाहिजे. भारताचं परम वैभव हेच आपलं लक्ष असलं पाहिजे.
- नवीन शिक्षा नीतीमध्ये आपल्या भाषा येत आहेत. मात्र आपण आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण देतो का ? उच्च शिक्षणात इंग्रजी भाषा आवश्यक मात्र त्याची खरच पूर्ण आवश्यकता आहे का. करियर करायला इंग्रजी भाषा आवश्यक आहे, असं बिलकुल नाही.
- आपली मातृभाषा महत्त्वाची आहे. आपल्या घरी मातृभाषा वापरतो का? निमंत्रण पत्रिका मातृभाषेत छापतो का ? हे आपण आपल्या पासूनच सुरवात करून पाहायचं आहे.
- मुलांना जास्त पैसे मिळविणारी डिग्री घ्या असं पालक सांगतात. मग ते शिक्षण तर पैसे कामविण्याची मशीन आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजी ही भाषा महत्त्वाची होती. त्यात आपल्या महापुरुषांनी सुद्धा शिक्षण घेतलं. मात्र त्यांनी आपली भाषा संस्कृती जपत आपल्या भाषेत काम केलं.
- वैभव प्रदर्शन बंद झालं पाहिजे. आपलं जीवन दुसऱ्याच्या जीवनाला हानी न पोहचवता जगलं पाहिजे. सरकारी नोकरी प्रत्येकाला मिळणे शक्य नाही. त्यासाठी उद्यामिता वाढली पाहिजे. सरकारने स्टार्टअप सुरू केलं. त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्याप्रमाणे काम केलं तर रोजगार निर्मिती होईल.
- li>