“भाजपबरोबरच नरेंद्र मोदी यांचाही हा नैतिक पराभव; ठाकरे गटानं भाजपच्या राजकारणाची पोलखोल केली

हा प्रश्न फक्त राहुल गांधींचा किंवा फक्त काँग्रेसचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण भारताच्या लोकतंत्र्याचा प्रश्न आहे त्यामुळे प्रातिनिधीपणे निश्चितपणे यावर विचार करत आहेत

भाजपबरोबरच नरेंद्र मोदी यांचाही हा नैतिक पराभव; ठाकरे गटानं भाजपच्या राजकारणाची पोलखोल केली
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 3:26 PM

नागपूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठवली होती. तर त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकीही रद्द करण्यात आल्याने देशातील राजकारण ढवळून निघाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्यावर कारवाई होताच भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई होताच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले आहे.

राहुलजी गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्याच्यापासून फळ काढण्यासाठी हिंडनबर्ग रिपोर्टवर जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि अदानी यांचे हितरक्षण करणे ही त्यांची परम जबाबदारी आहे.

या न्यायाने ते वागत असल्यामुळेच त्यांनी ही कारवाई केली असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांना शिक्षा सुनावणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे ही खरं तर लोकशाहीची हत्या असल्याचा घणाघात सुषमा अंधारे यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता ओबीसीची मुद्दा पुढं करून राजकारण करण्याचा डाव भाजपने चालू केला आहे.

आत्ता जेव्हा ते ओबीसीचा मुद्याच्या आडून खेळायला बघतात तेव्हा भाजपाला कळलं पाहिजे की दर वेळेला जातीचे आणि धर्माची कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. कारण ओबीसींबद्दल जर इतकं प्रेम भाजपाला असेल तर ओबीसीची जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भाजपा का विसरत आहे असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

आणि जर भाजप ओबीसीबद्दल एवढं प्रेम खरंच वाटत असेल तर भाजपाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची आत्तापर्यंतची ओबीसीची नेतृत्वांना कुजवत का ठेवलं आहे असा खोचक सवालही त्यांनी भाजपला विचारल आहे.

त्यामुळे भाजपने ओबीसीच्या प्रश्नांवर फार आकांड तांडव करण्याची गरज नाही असंही त्यांनी यावेळी सांगतिले. भाजपाची कालची कृती ही लोकशाहीची गळचेपी करणारी आणि हुकूमशाहीच्या नव्या तंत्राला जन्म देणारी आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

एका भारतातल्या सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट पार्टीच्या शिर्ष नेतृत्वावर जर आपण अशी कारवाई केली तर इतर सदस्यांनासुद्धा तशी दहशत बसू शकते.

यासाठी जाणीवपूर्वक घबराटीचे वातावरण तयार व्हावं विरोधकांनी प्रश्नच विचारू नयेत यासाठी केलेली ही कृती आहे असं स्पष्टीकरण त्यांनी राहुल गांधी यांच्या कारवाईवर बोलताना दिले आहे.

त्यामुळे ही कारवाई चुकीची आहे हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत राहू आता राहुलजी गांधी यांना इग्नोर करूच शकत नाहीत. या स्टेजमध्ये जेव्हा राहुल गांधी स्वतःची इमेज तयार करतात तेव्हा भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे.

14 पक्षांनी एकत्रित येऊन ईडीच्या संदर्भाने आता थेट न्यायालया धाव घेतलेली आहे आणि तिसरी बाब की भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्रित मोट बांधली आहे असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सभा चालू आहेत. दोन तारखेला संभाजीनगरला होणाऱ्या सभेमध्येसुद्धा हा मुद्दा चर्चेला येणार आहे.

उद्याच्या मालेगावच्या चर्चेला येईल त्यामुळे हा प्रश्न फक्त राहुल गांधींचा किंवा फक्त काँग्रेसचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण भारताच्या लोकतंत्र्याचा प्रश्न आहे त्यामुळे प्रातिनिधीपणे निश्चितपणे यावर विचार करत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.